Fertilizers Rate : रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी वाढ; वाचा… गोण्यांच्या नवीन किमती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आगामी खरीप हंगामापूर्वी रासायनिक खतांच्या दरात (Fertilizers Rate) मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून, शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच (Fertilizers Rate) होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.

हे आहेत खतांचे नवीन दर (Fertilizers Rate For Kharif Season 2024)

शेतकऱ्यांना सध्या 10.26.26 खताची गोणी (Fertilizers Rate) 1470 रुपयांना मिळते. जी आता 1700 रुपयांना मिळणार आहे. खताची 24.24.0 ही गोणी सध्या 1550 रुपयांना मिळते. जी आता 1700 रुपयांना मिळणार आहे. याशिवाय 20.20.0.13 ही खताची गोणी 1250 रुपयांना मिळते. जी आता 1450 रुपयांना मिळणार आहे. सुपर फॉस्फेटची गोणी सध्या 500 रुपयांना मिळते. जी आता नवीन दरानुसार 600 रुपयांना मिळणार आहे.

मशागतीच्या खर्चातही मोठी वाढ

अर्थात मिश्र खते, सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाली असून, त्यासोबतच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे. ज्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. ज्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार असून, या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

शेतमालाचे दर मात्र घटते

दरम्यान, शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे.

error: Content is protected !!