हॅलो कृषी ऑनलाईन : अवघ्या दोन अडीच महिन्यात मृग नक्षत्राची चाहूल लागून, आगामी खरीप हंगाम (Fertilizers Stock) सुरु होईल. मात्र, हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात रायासनिक खतांची कमतरता जाणवू नये. यासाठी युरिया व डीएपी खतांचा आवश्यक तो राखीव साठा करून ठेवावा. अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे मुंडे यांच्य्या अध्यक्षतेखाली आगामी 2024 च्या खरीप हंगामासाठी खत नियोजनाबाबत (Fertilizers Stock) बैठकी पार पडली. त्यावेळी त्यांना या सूचना केल्या आहेत.
‘राखीव साठा करून ठेवावा’ (Fertilizers Stock For Kharif Season)
जून, जुलै महिन्यात शेतकऱ्यांची खरीप पिकांसाठी लगबग सुरु होते. मात्र अशातच शेतकऱ्यांना खतांच्या गोण्या खरेदी करण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. प्रामुख्याने हंगामातील सुरुवातीला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची आवश्यकता असते. मात्र, त्या तुलनेत या दोन्ही महिन्यांमध्ये मागणीपेक्षा रासायनिक खतांची आवक कमी होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन हंगामातील सुरुवातीला शेतकऱ्यांना रासायनिक खतांची कमतरता जाणवणार नाही. यासाठी आवश्यक तो राखीव साठा (Fertilizers Stock) करण्यात यावा. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
‘आर्थिक निधी उभारला जाईल’
आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने प्रामुख्याने एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2024 या पहिल्या पाच महिन्यांच्या काळात दीड लाख टन व 0.25 लाख मीटर डीएपी खताचा संरक्षित साठा राज्यामध्ये करण्यात यावा. यासाठी राज्यातील संबंधित नोडल एजन्सींना खत साठवणूक, वाहतूक विमा खताची चढाई उतराई, जीएसटी सेवा शुल्क इत्यादी अनुषंगिक खर्चासाठी आवश्यकी तो आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
परिणामी रासायनिक खतांचा राखीव साठा करून ठेवण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती पावले उचलावी, अशा सूचनाही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अरुण दलाल, महाराष्ट्र कृषी व उद्योग विकास महामंडळाचे महेंद्र बोरसे तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.