अखेर शिराळा येथील बैलांच्या जीभ तुटीचे प्रकरण पोलिसात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले व ग्रामस्थांचा चिंतेचा विषय बनवून पशुसंवर्धन विभागाने देखील हात टेकलेले बैलांच्या अचानकपणे जीभ तुटीचे प्रकरण पोलिसात गेले असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. हा प्रकार खोडसाळपणाचा अथवा घातपाती आहे व यासाठी जबाबदार कोण आहे हे आता पोलीस तपासातून निष्पन्न होणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील शिराळा या गावात काही ठिकाणी ठराविक भागात रात्री अचानकपणे बैलाच्या जिभा तुटून पडत असल्याच्या प्रकाराने चांगलीच खळबळ माजली असून या घटनेमुळे शेतकरी बांधव भयभीत झाले आहेत. सदरील प्रकरणी पशुसंवर्धन विभाग देखील खडबडून जागा झाला व उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम शिराळा येथे आली व त्यांनी याबाबतच्या पडताळणी करून त्या तुटलेल्या जिभेचे तसेच तेथील माती व चाराचे नमुने देखील प्रयोगशाळेत पाठवून हा प्रकार एखाद्या रोगाचा अथवा जिवाणू किंवा विषाणूमुळे होत आहे. याबाबतची देखील सखोल तपासणी केली. परंतु या सर्व तपासणीत काहीच निष्कर्ष आला नाही त्यामुळे हा प्रकार एकाच गावात तसेच ठराविक भागात व फक्त बैलांनाच कसा होतो आहे याबाबत सशंकता निर्माण झाली.

हा प्रकार घातपाती किंवा खोडसळपणाचा असल्याचा संशय येत असल्यावरून याबाबत आता पोलीस प्रशासनच तपास करू शकते ही सर्वांशी खात्री झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार आज सेलूचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाढ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळी शिराळा गावी जाऊन या घटनास्थळाला भेट देऊन ग्रामस्थांशी व या घटनेच्या संदर्भाने संवाद साधला.

शेवटी केदारेश्वर सुधाकर शेजुळ यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात प्राण्यांची छळ व प्रतिबंध अधिनियम 1960 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!