Agriculture News : मागच्या काही महिन्यांपूर्वी लम्पी आजाराने राज्यभर धुमाकूळ घातला होता. या आजारामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली होती. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून सरकार मदत करत होते. मात्र मागच्या काही दिवसापूर्वी ही मदत थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा लम्पी संसर्ग आजारामुळे मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही त्यांना लवकरात लवकर ही मदत मिळणार आहे.
सरकारी योजनेला मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामधील लम्पीग्रस्त जनावरांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी लम्पी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यु झालेल्या जनावरांच्या पालकांना आर्थिक सहाय्य मिळाले नव्हते. याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य अमित देशमुख, नाना पटोले, हरिभाऊ बागडे, यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. यावेळी या प्रश्नावर उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे (Lumpy Disease Update)
याबाबत बोलताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र हे असे राज्य आहे ज्यामध्ये लम्पीमुळी दगावलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी केंद्र सरकारशी करार करण्यात आला असून या संदर्भातील लसीकरण पुण्यामध्ये सुरू होत आहे.
पशूंची खरेदी विक्री घरी बसल्या करायची आहे?
शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या पशूंची खरेदी विक्री घरी बसल्या करायची आहे तर तुम्ही ती घरी बसल्या देखील करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की घरी बसल्या कशी खरेदी विक्री करायची, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास ॲप बनवले आहे. Hello Krushi ॲप मध्ये तुम्ही तुमच्या पशुंची माहिती देऊन त्यांची घरबसल्या खरेदी विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi हे ॲप इंस्टॉल करावे लागेल जर तुम्ही शेतकरी असाल तर हे ॲप नक्की इंस्टॉल करा.