भारतात प्रथमच क्लोन गीर गायीचा जन्म; शास्त्रज्ञांनी रचला इतिहास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणातील कर्नाल येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने मोठा इतिहास रचला आहे. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल (हरियाणा) ने 2021 मध्ये उत्तराखंड लाइव्ह स्टॉक डेव्हलपमेंट बोर्ड, डेहराडूनच्या सहकार्याने गिर, साहिवाल आणि रेड-सिंधी सारख्या देशी गायींचे क्लोनिंग सुरू केले होते. त्याचे फळ आता मिळालं आहे. कारण या प्रकल्पांतर्गत 16 मार्च रोजी गिर जातीच्या क्लोन केलेल्या वासराचा जन्म झाला आहे. या वासराचे नाव गंगा असं ठेवण्यात आलं असून जन्मताच त्याचे वजन 32 किलो होते.

नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नालने क्लोनिंगसाठी गीर गायीची निवड करणे आणि देशी गायींचे संवर्धन आणि वाढीसाठी प्राणी क्लोनिंग तंत्र विकसित करणे सुरू केले होते. हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. इतर गायींच्या तुलनेत गीर गाय अधिक सहनशील आहे. ही गाय जास्तीचे तापमानही सहन करू शकते आणि थंडी सुद्धा सहन करते. तसेच विविध उष्णकटिबंधीय रोगांवरील रोग प्रतिकारशक्तीसाठी सुद्धा गीर गायओळखली जाते. यामुळेच आपल्या देशी गायींना ब्राझील, अमेरिका, आणि मेक्सिकोमध्ये मोठी मागणी आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला कोणत्याही एजंट शिवाय आणि हव्या त्या किमतीत गायी, म्हशी, कुत्रा यांसारख्या अनेक प्राण्यांची खरेदी किंवा विक्री करायची असेल तर आज Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून घरबसल्या तुम्ही पशु खरेदी- विक्री करू शकता. यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च नाही आणि कोणत्या एजंटकडे जाण्याची गरजही नाही. हॅलो कृषी मध्ये याव्यतिरिक्त रोजचा बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, कृषी केंद्र, खत दुकानदार, रोजचा हवामान अंदाज, यांसारख्या सुविधा अगदी मोफत मध्ये मिळतात. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच Hello Krushi डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

शास्त्रज्ञांच्या टीमचे प्रमुख डॉ. नरेश सेलोकर यांनी सांगितले की, म्हशींचे क्लोनिंग करण्याचे काम सुमारे 15 वर्षे सुरू होते. गायींचेही क्लोनिंग करावे, असे त्यांचे मत होते. त्यांनतर राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नालचे माजी संचालक डॉ. एम.एस. चौहान यांच्या नेतृत्वाखाली गिर, साहिवाल आणि रेड-सिंधी या देशी गायींचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू झाले. डॉ.नरेश सेलोकर, मनोजकुमार सिंग, अजय अस्वाल, एस.एस. लथवाल, सुभाष कुमार, रणजित वर्मा, कार्तिकेय पटेल आणि एम एस चौहान हे सर्वजण क्लोन केलेल्या गायींच्या उत्पादनासाठी देशी पद्धत विकसित करण्यासाठी 2 वर्षांहून अधिक काळ काम करत होते.

error: Content is protected !!