Fish Farming : शेतकऱ्यांना मासेपालनासाठी घरबसल्या मिळणार कर्ज; ‘ही’ आहे ऑनलाईन सुविधा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करताना शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. अशावेळी शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी, भांडवल उभे करण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसायासाठी घरबसल्या कर्ज मिळवता येणार आहे. केंद्र सरकारच्या जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी मासेपालन व्यवसाय करणाऱ्यासाठी हे भांडवल उभे करू शकतात. यामुळे मासेपालन उद्योगाच्या (Fish Farming) भांडवलासाठी पारदर्शकता आणण्यात मदत होणार आहे.

काय आहे जनसमर्थ पोर्टल? (Fish Farming Loan For Farmers)

केंद्रीय मासेपालन मंत्रालयाचे संयुक्त सचिव सागर मेहरा यांनी याबाबत म्हटले आहे की, सरकारचे जनसमर्थ पोर्टल हे शेतकऱ्यांना सर्व कर्ज योजनांसह मासेपालन (Fish Farming) करण्यासाठी सुरु करण्यात आलेले एकीकृत पोर्टल आहे. जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना मासेपालन करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने भांडवल उभे करता यावे. यासाठी सरकारी पातळीवरून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनसमर्थ पोर्टल सुरु करण्यात आले आहे. ज्यामुळे देशातील मासेपालन व्यवसायाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

3 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे केसीसी

देशातील मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मासेपालन व्यवसायासाठी भांडवल उभे करता यावे. यासाठी सरकारी पातळीवरून जागरूकता निर्माण केली जात आहे. ज्याद्वारे आतापर्यंत देशातील तीन लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे केसीसी कार्ड बनवण्यात आले आहे. त्यालाच जोडून आता मासेपालन उद्योगाच्या भांडवलासाठी पारदर्शकता आणण्यासाठी जनसमर्थ पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील मासेपालन करणारे शेतकरी किसान क्रेडिट कार्डद्वारे या जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करू शकतात. असेही सचिव सागर मेहरा यांनी म्हटले आहे.

25 हजार कोटींचा निधी

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मासेपालन आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री परषोत्तम रूपाला यांनी पशुंपाळां करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मासेपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वाटप केले होते. याशिवाय केंद्र सरकारकडून केसीसीच्या माध्यमातून या दोन व्यवसायांसाठी 25 हजार कोटी रुपयांच्या कर्ज वाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

error: Content is protected !!