Fish Farming : मासेपालन व्यवसायातील ‘हे’ आहेत बारकावे; ज्यातून मिळेल दुप्पट नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करतात. मासे पालनातून शेतकऱ्यांना अधिक नफा देखील मिळतो. मात्र, आज आपण मासेपालन व्यवसायातील काही बारकावे समजून घेणार आहोत. ज्याद्वारे शेतकरी आपल्या मासेपालन व्यवसासायातून दुपटीने अधिक नफा कमावू शकतात. बाजारात सध्या मासेपालनानाबत (Fish Farming) नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात, कमी मेहनतीमध्ये अधिक नफा मिळवू शकतात.

‘या’ बाबींवर विशेष लक्ष द्यावे (Fish Farming Get Double Profit)

मासेपालन व्यवसाय करताना माशांना केमिकल आधारित खाद्य देऊ नये. माशांसाठी साफसफाई असलेले स्वच्छ पाणी असावे. साफ आणि नितळ पाण्यात माशांची वाढ चांगली होते. याशिवाय वेळोवेळी मासेपालन (Fish Farming) क्षेत्रातील तज्ज्ञांचे योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. या तीन गोष्टींमध्ये मासेपालन व्यवसायाचे गमक दडलेले असल्याचे मासेपालन व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात. यासोबतच शेतकऱ्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती करून, त्यातून मासेपालन व्यवसायाची उभारणी करावी. ज्यामुळे मासेपालन व्यवसायातील उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते.

कोणत्या जातींची निवड करावी?

मासेपालन व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात, “प्रामुख्याने शेतकऱ्यांनी मासेपालन व्यवसाय करण्याचे निश्चित केल्यानंतर योग्य जातीची निवड करावी. यामध्ये शेतकरी रोहू, कटला, मृगला, ग्रास कार्प (गवत्या मासा), कॉमन कार्प, सिल्व्हर कार्प यांसारख्या आघाडीच्या जातींची मासेपालनासाठी निवड करू शकतात. जर तुम्ही एक एकर क्षेत्रातील तळ्यात 50 टनहुन अधिक उत्पादन मिळवत असाल. तर तुम्ही मासेपालन व्यवसायात योग्य ट्रकवर आहे, असे समजले जाते. मात्र, जर तुम्ही एकराच्या तळ्यात 30 ते 35 टन मासे उत्पादन मिळवत असाल. तर अशा वेळी संबंधित मासेपालन क्षेत्रातील जाणकारांकडून माहिती घ्यावी जेणेकरून तुम्हाला उत्पादन वाढीस मदत मिळेल.”

खाद्याबाबत काय काळजी घ्यावी?

मासेपालन व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात, मासेपालन व्यवसाय करताना माशांना कोणतेही केमिकल आधारित खाद्य खाण्यास देऊ नये. तुम्हाला कमी वेळेत माशांची अधिक वाढ हवी असेल तर त्यांना प्राकृतिक खाद्य देण्यावर भर द्यावा. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, मोहरीची ढेप, अन्य प्रकारची ढेप देऊ शकतात. किंवा मग बाजारात उपलब्ध असलेले माशांचे खाद्य देखील खरेदी करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला कमी वेळात माशांची योग्य वाढ होण्यास मदत होईल.

याशिवाय मासेपालन व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात, तुम्ही माशांना तळ्यांमध्ये जितके स्वच्छ पाणी ठेवाल तितकी माशांची वाढ जोमाने होईल. तळ्यामध्ये अन्य जीव देखील असतील तर त्यात तुम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळोवेळी जाळे टाकून माशांच्या वाढीचा अंदाज घ्यावा. असेही तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

error: Content is protected !!