Fish Farming : मासेपालन व्यवसायात प्रतिजैविकांचे उपयोग; वाचा… फायदे-नुकसान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी शेतीसोबतच मासेपालन व्यवसाय (Fish Farming) करण्यावर भर देत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला जोडून जोडधंदा चालत असल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मासेपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र आता शेतकऱ्यांना मासेपालन करताना शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागू नये. यासाठी शेतकऱ्यांनी काही प्रतिजैविके देणे गरजेचे असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण माशांचे प्रतिजैविक (Fish Farming) काय असते? त्याचा वापर कसा केला जातो? या प्रतिजैविकांचे फायदे-नुकसान काय आहेत? याबाबत सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

काय आहे माशांचे प्रतिजैविके? (Fish Farming Antibiotic Use For Farmers)

माशांचे प्रतिजैविके प्राकृतिकरित्या मानवाने (Fish Farming) बनवलेले असतात. या प्रतिजैविकांचा वापर माशांना संक्रमण होण्यापासून वाचवण्यासाठी आणि मासे उत्पादन वाढवण्यासाठी केला जातो. ही प्रतिजैविके माशांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश वाढवण्याचे काम करते. या प्रतिजैविकांच्या वापरामुळे मासेपालनाचा उत्पादन खर्च आणि देखरेख खर्च वाचण्यास मदत होते. त्यामुळे माशांना आहारासोबतच इंजेक्शनद्वारे प्रतिजैविके देणे खूप गरजेचे असते.

प्रतिजैविकांचा वापर कसा करावा?

सध्याच्या घडीला कृषीआधारित उद्योग असलेल्या मासेपालन उद्योगाचा वेगाने विकास होत आहे. आणि मासेपालनाचे महत्व लक्षात घेता या व्यवसायात प्रतिजैविकांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा वापर केल्याने मासेपालन करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. प्रतिजैविकांच्या वापरामुळे मासा पाण्यातील काही विषारी घटक खात असेल तरीही त्याला काहीही होत नाही. या प्रतिजैविकांचा वापर माशांना आहारात किंवा मग इंजेक्शनद्वारे केला जाऊ शकतो.

प्रतिजैविकांचे फायदे आणि तोटे?

प्रतिजैविकांचा उपयोग माशांच्या रोगजन्य समस्या दूर करण्यासाठी केला जातो. यामध्ये क्लोराम्फेनिकॉल, ऑक्सीटेट्रासाइक्लिन आणि एरिथ्रोमाइसिन यांसारखी औषधे जिवाणूजन्य रोगांवर आणि काही प्रमाणात परजीवी रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जातात. याशिवाय मासेपालनात प्रतिजैविकांचे काही तोटे आहेत. यामध्ये प्रतिजैविकांचा वापर करून मासे पाळले जात आहेत. त्या माशांमध्ये अँटी-मायक्रोबियल जिवाणू वाढण्याचा धोका असतो. हे मासे खाल्ल्याने मानवाचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळेच अमेरिकेने 2019 मध्ये मासेपालनात प्रतिजैविकांच्या वापरामुळे भारतीय झिंगा माशांची निर्यात खेप परत केली होती. त्यामुळे मासेपालनात प्रतिजैविकांचा वापर आवश्यकतेनुसार योग्य त्या प्रमाणात होणे गरजेचे असते.

error: Content is protected !!