Fishery Business : बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मासेपालन; महिला शेतकऱ्याची वार्षिक 15 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सध्या अनेक पुरुषांप्रमाणेच महिला शेतकरी देखील शेतीआधारित व्यवसायांमध्ये (Fishery Business) आपले भविष्य आजमावताना दिसत आहे. प्रामुख्याने शेतीसोबतच डेअरी व्यवसाय, शेळीपालन, मासेपालन या व्यवसायांची वाट धरताना अनेक जण दिसून येत आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे या व्यवसायांमधील बारकावे समजून घेऊन, त्यातून अधिकचे उत्पन्न मिळवण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे. महिला शेतकरी देखील शेतीआधारित व्यवसायामध्ये आपले एक अस्तित्व निर्माण करत आहे. आज आपण अशाच महिला शेतकऱ्याच्या मासे पालन व्यवसायातील (Fishery Business) यशाबद्दल जाणून घेणार आहोत.

मनोरमा सिंह असे या प्रगतिशील महिला शेतकऱ्याचे नाव असून, उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील पिपरापट्टी गावच्या त्या रहिवासी आहे. मनोरमा यांनी 2021 मध्ये आपल्या पाच एकर जमिनीमध्ये सामान्य पद्धतीने मासेपालन व्यवसाय (Fishery Business) सुरु केला होता. मात्र, आज त्या जिल्ह्यात मासेपालन व्यवसायातील आदर्श महिला शेतकरी म्हणून समोर आल्या आहे. मागील तीन वर्षांपासून बायोफ्लॉक या आधुनिक पद्धतीच्या माध्यमातून त्या मासेपालनातून 6 महिन्यांमध्ये 8 लाख रुपये इतकी कमाई करत आहे.

काय आहे बायोफ्लॉक तंत्रज्ञान? (Fishery Business Woman Success Story)

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे मासेपालन व्यवसाय करताना बायोफ्लॉक नावाचा जिवाणू वापरला जातो. या तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे मासेपालन (Fishery Business) करताना माशांना सीमेंट किंवा मोठ्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वाढवले जाते. त्यामध्ये माशांना वाढीसाठी सामान्यपणे खाद्य दिले जाते. त्यानंतर मासे हे खाद्य खाऊन, मलस्वरूपात पाण्यात विष्टेवाटे 75 टक्के खाद्य पुन्हा पाण्यात टाकतात. त्यानंतर खऱ्या अर्थाने बायोफ्लॉक जिवाणूंचे काम सुरु होते. हे बायोफ्लॉक जिवाणू माशांच्या विष्टेला पुन्हा प्रोटीनमध्ये रूपांतरित करण्याचे काम करतात. ज्यास मासे पुन्हा खातात. विशेष म्हणजे या बायोफ्लॉक तंत्रज्ञानापासून तयार झालेले खाद्याद्वारे माशांची वाढ खूप वेगाने होते.

कोणत्या जातींची निवड

मासे उत्पादक शेतकरी मनोरमा सिंह सांगतात, मासेपालन सुरु करताना आपण सरकारच्या अनुदान योजनेचा लाभ घेतला. ज्यामुळे आपला व्यवसायाच्या सुरुवातीला होणारा खर्च वाचला. बायोफ्लॉक तंत्रज्ञानाद्वारे आपण शेतामध्ये 35-35 फुटांचे छोटे तळ्यासारखे कृत्रिम तलाव तयार केले आहे. या तलावांमध्ये आपण मागील तीन वर्षांपासून फंगेसियस आणि तिलपिया या माशांच्या प्रजातीच्या माध्यमातून मासेपालन व्यवसाय करत आहोत.

किती मिळतंय उत्पन्न?

फंगेसियस आणि तिलपिया या दोन्ही माशांच्या प्रजातीपासून सहा महिन्यांमध्ये आपल्याला 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. अर्थात वार्षिक 15 ते 16 लाखांची कमाई हमखास होत असल्याचे त्या सांगतात. यावर्षी आपण नव्याने काही शेती विकत घेतली असून, मासेपालन व्यवसायाचा विस्तार करत आपण फंगेसियस, तिलपिया या माशांच्या जातीसह देशी मांगुर, सिंघी या जातींचे पालन करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!