Fishery Business : शेती सोडून मासेपालनाकडे वळले; वर्षाला करताय 7 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात मासेपालन व्यवसाय (Fishery Business) करण्याकडे हळूहळू शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. प्रामुख्याने शेतीतुन मिळणारे बेभरवश्याचे उत्पन्न आणि पिकांचे उत्पादन घेताना येणारी नैसर्गिक संकटे, यामुळे अनेकजण सध्या शेती संबंधित अन्य व्यवसायाकडे वळत आहे. विशेष म्हणजे मांसाला असलेली मागणी पाहता मासेपालनातुन शेतकऱ्यांना अधिकचा लाभ देखील मिळतो. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या मासेपालन उद्योगातील (Fishery Business) यशाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी स्वतःच्या आवडीलाच व्यवसायामध्ये रूपांतरित करत, त्यातून ते वार्षिक ७ लाखांची कमाई करत आहे.

2 हेक्टरमध्ये तलावनिर्मिती (Fishery Business Earning 7 Lakhs Per Year)

लाल डिंगलियाना असे या मासेपालन व्यवसाय (Fishery Business) करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून, ते देशातील अतिपूर्वेकडील मिजोरममधील राज्यातील रहिवासी आहेत. प्रामुख्याने मांसाला बाजारातील वाढती मागणी पाहता, ते मासे शेतीकडे वळले. शेतीतून मिळणारे अल्प उत्पन्न, त्यातून होणारी आर्थिक ओढाताण यामुळे त्यांनी संपूर्णपणे मासेपालन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. लाल डिंगलियाना यांनी आपल्या २ हेक्टर जमिनीमध्ये 19 सिमेंट तलाव निर्माण केले आहे. यासाठी त्यांना २०१७ मध्ये सुरुवातीला ८ लाखांचा खर्च आला. मात्र, त्यानंतर त्यांना दरवर्षी वार्षिक ७ लाखांची कमाई मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोणत्या जातीची निवड?

लाल डिंगलियाना यांनी मासेपालनासाठी (Fishery Business) ‘कॉमन कार्प’ या प्रजातीची निवड केली आहे. त्यांना गेल्या पाच वर्षांमध्ये या प्रजातीच्या माश्यापासून एकूण 8 टन उत्पादन मिळाले. ज्यासाठी त्यांना एकूण 10 लाख रुपये खर्च आला. पहिल्या वर्षी उत्पादनातून सुरुवातीची एकूण गुंतवणूक मिळाली. त्यानंतर त्यांना मागील ५ वर्षांपासून मासे उत्पादनातून 31 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले. ज्यातून १० लाख रुपये खर्च वजा जाता, 21 लाख रुपये उत्पन्न मिळाले.

किती मिळतंय उत्पन्न?

त्यानंतर त्यांनी यावर्षी ‘कॉमन कार्प’ माशाच्या प्रजनन प्रक्रियेत सुधारणा करत, मासे उत्पादनाच्या उसळी घेतली आहे. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून, ज्यामुळे त्यांना मासे उत्पादनात वाढ करण्यास मदत झाली आहे. सध्या त्यांनी आपल्याकडे ८ लोकांना नियमित रोजगार उपलब्ध करून, दिला आहे. तसेच व्यवसायामध्ये काही सुधारणा केल्याने, मासेपालनातून त्यांना वार्षिक ७ लाखांचा निव्वळ नफा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांची मासेपालन व्यवसायातील कामगिरी पाहून, केंद्र सरकारने त्यांना 2019 साली पूर्वेकडील सर्वश्रेष्ठ मत्स्य किसान पुरस्कार प्रदान केला आहे.

error: Content is protected !!