Flood Management : दुष्काळी मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी; 4000 कोटींचा निधी मंजूर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती (Flood Management) निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर (Flood Management) यांनी माध्यमांना दिली आहे.

जागतिक बँकेच्या पथकाकडून पाहणी (Flood Management In Maharashtra)

चार वर्षांपूर्वी 12 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची (Flood Management) जागतिक बँकेच्या पथकाने पाहणी केली होती. पाहणीनंतर या पथकाची त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक बैठक पार पडली होती. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थिती कमी करून, मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातील पाणी वळवण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर आता या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक पार पडणार आहे. असेही राजेश क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

अनेक गावांना पडतो पुराचा विळखा

राज्यात ऐन पावसाळ्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होते. ज्यामुळे मागील पाच वर्षात 2019 आणि 2021 असा दोन वेळा या भागातील नागरिकांना भीषण पुरस्थितीचा फटका सहन करावा लागला. या दोनही वर्षी महापुरामुळे कोल्हापूर, इचलकरंजीसह करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला. ज्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा फटका सहन करावा लागला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने पूर नियंत्रणासाठी या भागातील पाणी मराठवाड्यातील दुष्काळी भागात वळविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून हा निधी मंजूर झाला आहे.

दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि एकूणच शेती क्षेत्राला या प्रकल्पामुळे मोठा फायदा होणार आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांना पाण्याअभावी नेहमीच कोरडवाहू पिके घ्यावी लागतात. त्यामुळे आता पुढील काही वर्षांमध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मराठवाड्यातील जिल्हे पाणीदार होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेतेखाली बैठक पार पडल्यानंतर तात्काळ या प्रकल्पाचे सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!