Floriculture : नोकरीपेक्षा फुलशेती फुलवली; गुलाब शेतीतून एमबीए तरुणाची भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या फुलशेतीमध्ये (Floriculture) बरेच शेतकरी आपले नशीब आजमावत असून, त्यास तंत्रज्ञानाची देत बाजार मिळवण्यासह चांगला नफा मिळवत आहे. अनेक शेतकरी पॉलिहाऊसमध्ये फुलशेती (Floriculture) करण्याला प्राधान्य देतात. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेंद्रा कमंगर गावातील शेतकरी मनोज दिलवाले हे खुल्या पद्धतीने मागील तीन वर्षांपासून गुलाबाची शेती करत चांगली कमाई करत आहे.

मनोज यांनी एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र त्यांनी नोकरीऐवजी शेतीची कास धरली. सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने शेती करू लागले मात्र त्यातून फारसा नफा मिळत नसल्याने त्यांनी 2019 मध्ये फुलशेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांची स्वतःची 10 एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी ३ एकरावर गुलाब आणि शेवंतीची लागवड केली आहे. अन्य तीन एकरमध्ये त्यांनी फळबाग लावली आहे. तर उर्वरित दोन एकरमध्ये पाण्याचे सुयोग्य नियोजन करत दोन शेततळी उभारली आहेत.

शिर्डी गुलाबाची निवड (Floriculture Farmer Manoj Dilwale)

मनोज यांनी शिर्डी गुलाबाची लागवड केली असून, त्यांच्याकडे सध्या 2200 गुलाबाची झाडे आहेत. या गुलाबाची दिवसातून दोनवेळा तोडणी केली जाते. मात्र त्यासाठी विशिष्ट वेळ सांभाळत तोडणी करावी लागते, कारण त्याचा उमलण्याच्या रोख सांभाळावा लागतो. असे मनोज यांनी सूक्ष्म नियोजनातुन अनुभवले आहे. तसेच मागणीनुसार मनोज दसरा, दिवाळी आणि गणपतीचा कालावधीत मोठ्या प्रमाणात नफा मिळतात. या कालावधीत फुलांना मागणी अधिक असते.

किती मिळतो दर?

त्यांनी लावलेल्या 2200 झाडांमधून ते दररोज जवळपास 30 किलो गुलाबाची तोडणी करतात. या गुलाबास त्यांना संभाजीनगर येथील मार्केटमध्ये सरासरी 100 ते 120 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतो. सण आणि लग्नसमारंभाच्या काळात हा दर 200 ते 300 प्रति किलोपर्यंत मिळत असल्याचे ते सांगतात. त्यामुळे त्यांना कमी उत्पादन खर्चात दररोजचे 2 ते 3 हजार रुपये मिळत असल्याचे ते सांगतात. वर्षातील छाटणीचे दोन महिने सोडले तर 10 महिने गुलाब शेतीतून उत्पन्नाची हमी असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!