Flower Cultivation : झेंडू लागवडीसाठी मिळतंय अनुदान, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इतर हंगामाच्या तुलनेत खरीप पिकाचा काळ हा शेतकऱ्यांसाठी विशेष मानला जातो. याचे कारण हा हंगाम पावसाळ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे यावेळी घेतलेली पिके बहुतांशी नगदी पिकांमध्ये गणली जातात. सध्या अनेक शेतकरी फळशेती आणि फुलशेती लागवड करताना दिसत आहेत. फुलशेती करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च देखील येतो. मात्र याच दरम्यान बिहार सरकारने पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून पिकवल्या जाणाऱ्या फुलांच्या लागवडीसाठी मोठी घोषणा केली आहे. चलातर मग जाणून घेऊया याबाबत माहिती.

झेंडू लागवडीवर मिळणार अनुदान

बिहार सरकारने फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. ज्यामध्ये झेंडूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार 70 टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे. शेतकऱ्यांना फुलांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांचे उत्पन्नही वाढणार आहे.

किती मिळणार अनुदान?

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेअंतर्गत बिहार सरकार ही अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना देणार आहे. सरकार त्याच्या लागवडीसाठी 40000 रुपयांच्या खर्चावर 70 टक्के म्हणजे सुमारे 28000 रुपये अनुदान देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बिहारमधील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महारष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळते का अनुदान?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तर बिहारमधील शेतकऱ्यांसाठी अनुदान झाले मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं काय? तर टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला यासाठी एक छोटे काम करायचे आहे. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला Hello Krushi हे अँप डाउनलोड करावे लागेल. या अँपच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत याबाबत सविस्तरपणे माहिती मिळेल. त्याचबरोबर हवामान अंदाज, बाजारभाव, जमीन मोजणी, सातबारा उतारा, पशूंची खरेदी विक्री इत्यादी गोष्टींची अगदी मोफत माहिती मिळेल. त्यामुळे लगेचच हे अँप मोबाईलमध्ये इंस्टाल करा.

अर्ज कसा करायचा?

जो कोणी शेतकरी त्याची लागवड करतो आणि त्याच्याशी संबंधित लाभ घेऊ इच्छितो, सर्वप्रथम, तुम्हाला बिहार सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन संबंधित नोंदणी फॉर्म भरावा लागेल, सर्व पर्याय भरल्यानंतर, तुम्ही ते सबमिट कराल. त्यांनतर तुम्हाला यासाठी अनुदान दिले जाईल.

error: Content is protected !!