हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेतीमध्ये सध्या नवनवीन प्रयोग (Flower Farming) करताना दिसतात. पीक पद्धतीत बदल करत वेगवेगळी पिके घेऊन अधिक उत्पन्न मिळवतात. मात्र आता तुम्हीही पारंपरिक पिकांऐवजी अन्य पिकांच्या लागवडीचा विचार करत असाल तर रजनीगंधा शेती तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. रजनीगंधा फुलांचा उपयोग अत्तर आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी होत असल्याने त्यांना बाजारात विशेष मागणी असते. इतकेच नाही तर या फुलांच्या लागवडीसाठी (Flower Farming) सरकारकडून अनुदानही दिले जाते.
गेल्या काही वर्षांत रजनीगंधा या फुलांच्या (Flower Farming) मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अत्तर आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासह लग्नसमारंभात घर आणि मंडप सजावटसाठीही या फुलांना मोठी मागणी असते. अनेक राज्यांमध्ये रजनीगंधा फुलांची शेती केली जात असून, भारतातून थायलंडलाही ही फुले पुरवली जात आहेत. या फुलांना दरही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारकडून नव्याने रजनीगंधा शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. याशिवाय काही राज्यांनी शेतकर्यांसाठी हेल्पलाइन क्रमांकही जारी केले जातात. जेणेकरुन या शेतीशी संबंधित कोणाला काही समस्या किंवा प्रश्न असल्यास त्यांना त्याची उत्तरे मिळू शकतील. रजनीगंधा शेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र आणि हरियाणा सरकारकडून एकरी 24,000 रुपयांचे अनुदान दिले जाते.
जमीन कशी हवी? (Flower Farming Rajnigandha Cultivation)
रजनीगंधा फुलांच्या लागवडीसाठी मुरमाड जमीन चांगली मानली जाते. या फुलाच्या कंद लागवडीसाठी मातीचे पीएच मूल्य हे 6.5 ते 7.5 इतके असावे. त्यामुळे शेतकऱ्यांना रजनीगंधा शेती करायची असेल तर सर्वप्रथम गुळगुळीत व वालुकामय जमीन निवडावी करावी. यासाठीची जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. शेतातून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पाणी साचून राहणार नाही. एका एकरात 2100-2500 कंदांची लागवड करता येते. कंद लागवडीनंतर 4 ते 5 महिन्यांनी फुले यायला सुरुवात होते. फुले दूर पाठवायची असतील तर ती फुलण्याआधीच काढावीत. फुलांचा वापर गजरा किंवा हार बनवण्यासाठी होणार असेल तर सकाळी फुले तोडावी. देठासह फुले तोडल्याने त्यांची किंमत वाढते.
रोगांचा प्रादुर्भाव
पिकामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे निशिगंधाचे कंद कुजतात. तसेच या झाडांमध्ये बुरशीची वाढ होते. बुरशीपासून बचाव करण्यासाठी ब्रॅसिकॉलचा वापर करावा. पानांवरचे ठिपके व इतर रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी कार्बेन्डाझिम दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने झाडांवर फवारावे. पाने कोमेजत असतील तर जीनेब औषधाची फवारणी योग्य प्रमाणात करावी.
किती मिळते उत्पन्न
रजनीगंधा पिकाची लागवड त्याच्या कंदापासून म्हणजेच मुळांपासून केली जाते. कंद लागवडीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुमारे 1 ते 2 लाख रुपये खर्च केले जातात. ज्यामध्ये प्रति हेक्टरी सुमारे 90 ते 100 क्विंटल फुलांचे उत्पादन होते. एकदा कापणी केल्यावर, फुले वेगाने वाढतात. जी विकून वर्षभरात 4 ते 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा शेतकऱ्यांना मिळवता येतो.