Fodder Crops Cultivation: या महिन्यातच करा ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांची लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: भरपूर व उत्कृष्ट प्रतिचा चारा (Fodder Crops Cultivation) सातत्याने मिळण्यासाठी धान्य पिका प्रमाणेच चारा पीक लागवडीचे नियोजन करणे गरजेचे असते. सध्या महाराष्ट्रात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. मार्च एप्रिल महिन्यात ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांची (Fodder Crops Cultivation) लागवड केली जाते. जाणून घेऊ या पिकांच्या लागवडीविषयी माहिती.  

चारा पिके – ज्वारी, बाजरी, मका (Fodder Crops Cultivation)

जमीन

ज्वारी पिकासाठी मध्यम, बाजरी साठी हलकी ते मध्यम व मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

सुधारित वाण (Improved Varieties)

ज्वारी – रुचीरा आर-4-11, मालदांडी 35-1, निळवा, एमपी चारी, पुसा चारी, आय एस 4776, एएसजी 14, एमकेव्ही चारी.

बाजरी – जाएन्ट बाजरा, गराजको

मका – आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट विजय, गंगासफेद डेक्‍कन हायब्रीड.

बियाणे ( Seed Quantity)

ज्वारी – प्रति हेक्टरी 20 किलो बियाणे वापरावे

बाजरी – प्रति हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे

मका –  प्रति हेक्टरी 40 ते 45 किलो बियाणे वापरावे

लागवड पद्धत आणि पेरणीचे अंतर

ज्वारी, बाजरी आणि मका या तिन्ही पिकांची लागवड पाभरीने पेरणी करून करावी. लागवडीसाठी 30 × 45 सें. मी. अंतर ठेवावे.

खते प्रति हेक्टरी (Fertilizer Management)

ज्वारी, बाजरी आणि मका पिकांसाठी 25–30 टन कंपोस्ट, नत्र 80 किलो, स्फुरद 40 किलो व पालाश 40 किलो याप्रमाणात खते द्यावी.

पाणी व्यवस्थापन (Water Management)

या पिकांना इतर हंगामात पाणी देणे गरजेचे असते. परंतु उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

उत्पादन (Production)

योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति हेक्टरी ज्वारीचे 40 ते 45 टन, बाजरीचे 35 ते 40 टन आणि मक्याचे 45 ते 50 टन उत्पादन मिळू शकते.

error: Content is protected !!