Fodder Seed Subsidy: पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान; मिळवा 100 टक्के अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (Fodder Seed Subsidy) पशुसंवर्धन विभागा मार्फत वैरण आणि खाद्य अभियान राबविले जाते. पडीक किंवा गवती कुरणक्षेत्र जमिनीवर पात्र शेतकर्‍यांना मका बियाण्यासाठी (Maize Seed) 100 टक्के अनुदान (Fodder Seed Subsidy) दिले जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा (Department of Animal Husbandry) मार्फत यापूर्वी उन्हाळ्यात सन 2023-24 या वर्षाकरिता वैरण बियाणे (Fodder Seed Subsidy) वाटप करणे या योजनेसाठी पात्र लाभार्थ्याकडून मे महिन्यात अर्ज मागविले होते. वैरण व पशुखाद्य विकास या सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर प्रति लाभार्थी 1500 रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप केले होते. खरीप हंगामातही वनक्षेत्र नसलेल्या नापीक (Barren Land), गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर (Waste Land) वैरण उत्पादनासाठी (Fodder Production) शेतकर्‍यांना 100 टक्के अनुदान (Subsidy) दिले.

काय आहे अभियान? (Fodder Seed Subsidy)
पशुधन उत्पादन प्रणालीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले. जनावरांच्या चारा आणि खाद्य स्त्रोताच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे (Fodder Seed Subsidy) दिले जाते.

कोणत्या जमिनीत घेता येते वैरण?
वनक्षेत्र नसलेल्या नापीक, गायरान, गवती कुरणक्षेत्र व पडीक जमिनीवर वैरण घेता येते.

योजनेचे निकष काय?
शेतकर्‍याकडे सातबारा, आठ अ असावा. जमीन पडीक, गवती कुरणक्षेत्र असावी. 
या योजनेत प्रति लाभार्थी 1500 रुपये मर्यादित वैरण बियाणे वाटप करण्यात येते.

शासनाचे 100 टक्के अनुदान
वैरण उत्पादनासाठी 100 टक्के अनुदानावर पात्र शेतकर्‍यांना बियाणे पुरविण्यात येते.

कोठे अर्ज करणार?
स्थानिक पशु वैद्यकीय दवाखान्यात किंवा पंचायत समिती स्तरावर पात्र शेतकर्‍यांकडून अर्ज स्वीकारले जातात. तेथून उपलब्ध अनुदानानुसार पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज पाठविले जातात.

error: Content is protected !!