Fodder Shortage : चारा टंचाई..! जालना जिल्ह्यातून बाहेर चारा वाहून नेण्यास बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात चारा टंचाईचे (Fodder Shortage) संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागांमध्ये त्या-त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाकडून, जिल्ह्याबाहेर चारा वाहतुक करण्यास बंदी (Fodder transport ban) घालण्यात आली आहे. अशातच आता जालना जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात वाहून नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (District Collector) श्रीकृष्ण पांचाळ यांनी याबाबत निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सध्याची चाऱ्याची उपलब्धता (Fodder Shortage) पाहता पुढील 4 महिने हा निर्णय लागू असणार आहे. असे जालना जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप (Fodder Shortage In Jalna District)

मागील वर्षी खूपच कमी प्रमाणात पाऊस झाला. ज्यामुळे खरीप हंगामात मका (Maize), बाजरी (Bajara) या चारा पिकांचे उत्पादन खूपच कमी राहिले. परिणामी, सध्या कोरड्या चाऱ्याचा तुटवडा (Fodder Shortage) जाणवत आहे. तर आगामी काळात यामध्ये आणखीच घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्यामुळे सतर्कतेचा उपाय म्हणून जालना जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय चारा टंचाई निर्माण होऊ नये. यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा प्रशानाकडून चारा उत्पादन घेण्यासाठी बियाणे वाटप करण्यात आले आहे. आगामी जून महिन्यात समाधानकारक पाऊस (Rain) होऊन जिल्ह्यात चारा मुबलक उपलब्ध झाला. तरच या नियमात बदल करण्याचा विचार केला जाईल. अन्यथा पुढील 4 महिन्यासाठी हा निर्णय लागू असणार आहे.

यापूर्वी ‘या’ जिल्ह्यांमध्ये बंदी

दरम्यान, जालना जिल्ह्यात एकूण 5 लाख 3 हजार 72 जनावरे आहेत. यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या 3 लाख 24 हजार 313 इतकी आहे. परिणामी, इतक्या अधिकच्या पशुधनाला मोठ्या प्रमाणात चाऱ्याची आवश्यकता भासते. परिणामी, जिल्ह्यात उत्पादित झालेला चारा कमी पडू नये. यासाठी जालना जिल्ह्याबाहेर चाऱ्याची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यापूर्वी सोलापूर, सांगली, नाशिक, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील संबंधित जिल्ह्याधिकऱ्यांनी चारा वाहतूक बंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे आता राज्यात भीषण चारा टंचाईचे वास्तव अधोरेखित होत आहे.

error: Content is protected !!