Fodder Shortage Disadvantage: चारा, पाणी टंचाईचे दुष्परिणाम; शेतकरी करत आहेत जनावरांची विक्री!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी आणि त्यांचे पशुधन (Fodder Shortage Disadvantage) यांचे ऋणानुबंध सर्वांनाच माहित आहे. परंतु सध्या सगळीकडे वाढत जाणारी पाणी आणि चारा टंचाई (Water & Fodder Scarcity) यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुंसाठी चारा उपलब्ध करता येत नाही आहे. त्यामुळे शेतकरी त्यांच्या जनावरांची विक्री करत आहेत (Fodder Shortage Disadvantage).

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, वैजापूर, पैठण, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात गेल्या वर्षी अल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळी (Drought) परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या जनावरांना चारा नसल्याने (Fodder Shortage Disadvantage) पशुपालक आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात (Animal Sale Market) आणत आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बाजारात जनावरांची विक्री (Animal Sale) तीन पटीने वाढली आहे.

जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात जून पर्यंत तर कन्नड तालुक्यात अवघा महिनाभर पुरेल एवढाच चारा शिल्लक (Fodder Shortage) असून या भागातील शेतकरी चारा छावणी (Fodder Camp) सुरू करण्याची मागणी करत आहे. तर वैजापूर तालुक्यात पाणी टंचाई अधिक प्रमाणात गंभीर होत असून सिल्लोड, सोयगाव आणि पैठण भागातील जनावरांच्या बाजारात जनावरांच्या किमती कमालीच्या घटल्या आहेत. 

अलीकडे शेतीला शेतीपूरक जोडधंदा म्हणून अनेक शेतकर्‍यांनी गायींची खरेदी केली होती. मात्र गेल्या वर्षीच्या खरीप सह रब्बीत चारा उत्पादन घटल्याने तसेच अल्प पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याच्या प्रश्न (Fodder Shortage Disadvantage) गंभीर झाला आहे.  यामुळे अनेक शेतकरी आपल्या दारातील पशुधन आठवडी बाजारात कवडीमोल भावात विकत आहेत.

बाजारात गेल्या काही दिवसांपासून जनावरांची आवक वाढल्याने व्यापारीही कवडीमोल दराने त्यांची खरेदी (Animal Purchase) करीत आहेत. दोन महिन्यांनी मात्र जेव्हा शेतकरी शेती मशागतीकरिता ही जनावरे बाजारात खरेदी करण्यासाठी जातील तेव्हा मात्र त्यांना अधिक दाम द्यावे लागतील अशीही चर्चा यानिमित्ताने जाणकार वयोवृद्ध शेतकरी करत आहे .

error: Content is protected !!