Fodder Shortage: जालना जिल्ह्यात होणार चाऱ्यांची पेरणी; शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: यंदा पाणी टंचाईमुळे चारा निर्मितीवर (Fodder Shortage) मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. यंदाच्या दुष्काळामुळे (Drought) पुढे येणाऱ्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत.  यातली एक उपाययोजना म्हणजे चाऱ्याची पेरणी. त्यानुसार जालना जिल्ह्यातील 7 हजार शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे (Fodder Seeds) वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून 600 मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील 766 गावांमध्ये चाऱ्याचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात चारा टंचाईवर (Fodder Shortage) मात करण्यासाठी मदत होणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले.

मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्रशासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारा (Fodder Crops) लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

18 ते 22 मार्च या काळात शेतकऱ्यांना चाऱ्याचे बियाणे वाटप (Seed Distribution) करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चाऱ्याची टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. जनावरांना चारा उपलब्ध होत नसल्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कदाचित मे महिन्यात चारा उपलब्ध झाल्यानंतर पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

गाळ पेऱ्यातदेखील पेरणी (Fodder Cultivation)

सध्या जिल्ह्यातील अनेक धरणे तसेच तलावांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे गाळामध्ये चाऱ्याची पेरणी करण्यात येणार आहे. गाळपेऱ्यामध्ये चारापेरणी करण्याचे ठरवण्यात आले आहे.

यानुसार, 198 गावांतील 3 हजार 120 लाभार्थ्यांना चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. गाळपेऱ्यातील 1  हजार 248 हेक्टर जमिनीवर चाऱ्याची पेरणी होणार आहे. 74 हजार 800 मेट्रिक टन चारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट प्रशासनाकडून ठेवण्यात आलेले आहे.

मे महिन्यात चारा मिळणार (Fodder Shortage)

दहा दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील 7 हजार 728 शेतकऱ्यांना 11 हजार क्विंटल चाऱ्याच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. हा चारा उपलब्ध होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा अवधी लागणार आहे. यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाऱ्याची उगवण होणार आहे. यानंतर या चाऱ्याचे शेतकऱ्यांना वाटप येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!