Food Processing : आवळ्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ; प्रक्रिया उद्योगातून होईल मोठी कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आणि पित्तनाशनासह इतर अनेक औषधी गुणधर्मांविषयी सर्वांनाच माहिती (Food Processing) आहे. पण आवळ्यावर प्रक्रीया करून त्याच्यापासून व्यवसाय करण्यासाठी चांगली संधी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे रेडीमेड पदार्थांना चांगली बाजारपेठ असून कमी खर्चात आवळ्याच्या मुरंबा, आवळा कँडी अशा वेगवेगळ्या पदार्थांचा व्यवसाय करण्यास चांगला वाव आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण असे कोणते पदार्थ आहेत? जे आवळ्यापासून (Food Processing) बनवले जाऊ शकतात. याबाबत जाणून घेणार आहोत.

बनवू शकतात हे पदार्थ? (Food Processing Gooseberry)

आवळ्याचा मुरंबा : मोठी परीपक्व गच्च आवळे निवडुन एका भांड्यात पुष्कळ पाणी घेऊन त्यात चुन्याची निवळी व तुरटी घालुन टोचलेली आवळे दोन दिवस बुडवून ठेवावीत. नंतर नरम हाईपर्यंत शिजवावित किंवा वाफऊन (Food Processing) घ्यावीत. शिजल्यावर एका कापडावर पसरुन 3-4 तास ठेवावीत. नंतर साखरेचा पक्का पाक करुन त्यात घालावे. हवे असल्यास केशर मिसळावी. पाक घटट् झाल्यावर मुरंबा थंड करुन बरणीत भरावा.

आवळा कॅन्डी : मोठ्या आकाराची परीपक्व फळे निवडुन प्रथम पाण्याने धुवून घ्यावीत त्यानंतर उकळत्या पाण्यात 10 ते 12 मिनीटे उकळुन थंड झाल्यानंतर हाताने आवळयापासुन बी व फोडी वेगळया करुन घेणे (Food Processing) व त्यात 1 टक्का लिंबूसत्व मिसळावे. 70 टक्के साखरेच्या पाकात 4 ते 5 दिवस आवळा फोडी पाकवून नंतर फोडी पाकापासुन वेगळ्या करुन झटपट पाण्यात धुऊन सावलीत 3 ते 4 दिवस सुकवावीत. त्यानंतर कॅन्डी काढुन वाळवावी. तयार झालेली आवळा कँडी प्लॅस्टिकच्या पिशवीत भरुन हवाबंद करुन थंड व कोरड्या जागेत ठेवावी.

आवळा सुपारी : आवळे पाण्याने स्वच्छ धुवावेत. त्यानंतर ते प्रेशर कुकरमध्ये 15 मिनीटे शिजवावत, शिजलेल्या आवळयातून बिया काढुन टाकाव्यात. आवळयाच्या फोडी, कोथींबीर, हिरवी मीर्ची, मीठ, हिंग, जिरे व काळे मिरे टाकुन मिक्सरच्या साहयाने त्याचा लगदा करावा. चटणी बरणीत भरुन खोलीच्या तापमाणाला व फ्रीजमध्ये साठवता येते.

आवळ्याची चटणी : मोठ्या आकाराची आवळे निवडावीत, ती पाण्याने स्वच्छ करुन घ्यावी. 4 ते 5 मिनीटे पाण्यात उकळुन घ्यावी व ती थंड करुन घ्यावी. थंड झाले. आवळ्याच्या फोडी करुन त्यामध्ये 40 ग्रॅम मीठ प्रतिकिलो या प्रमाणात मिसळावे व वाळवणी यंत्रात 600 सेल्सिअस तापमानाला वाळवावी (किंवा सुर्यप्रकाशात वाळवावी). ही वाळलेली सुपारी प्लास्टिक पिशवीमध्ये साठवावी.

आवळा बर्फी : उत्तम प्रतीचे आवळे निवडावेत व ते उकळत्या पाण्यात उकळुन घ्यावी. त्यानंतर त्याच्या फोडी वेगळया करुन घ्याव्यात. नंतर आवळ्याच्या फोडीचा लगदा करुन घ्यावा. एका भांड्यात साखर आणि पाणी घालुन पाक तयार करावा. आवळा लगदा, तूप आणि चवीसाठी आल्याचे लगदा घालुन चमच्याच्या मदतीने एकजीव करुन घ्यावे. जाड लगदा तयार झाल्यावर त्यात मैदा, मक्याचे पीठ, दालचिनी पावडर टाकून त्याची बर्फी बनवावी.

error: Content is protected !!