Food Processing : कमी खर्चात सुरु करा ‘हे’ चार व्यवसाय; सरकारही देते उद्योगासाठी अनुदान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसोबत एखादा चांगला उत्पन्न मिळवून देणारा जोड व्यवसाय (Food Processing) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अल्पभूधारक, भूमीहीन शेतकरी बहुतांशी डेअरी व्यवसाय करतात. मात्र, कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या प्रक्रीया उद्योगांसह अनेक व्यवसाय शेतकऱ्यांना करता येऊ शकतात. यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून सुक्ष्म अन्न प्रक्रीया तसेच इतर योजनांमधून व्यवसायासाठी अनुदान मिळते. अनेकांना प्रक्रीया उद्योगांमधून उत्पन्नाचा चांगला मार्ग सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेतीसोबतच करता येणाऱ्या चार व्यवसायांबद्दल (Food Processing) जाणून घेणार आहोत.

‘हे’ आहेत चार प्रक्रिया उद्योग (Food Processing Business)

कोरफड ज्यूस : कोरफडाचे आयुर्वेदिक फायदे आणि वाढती मागणी लक्षात घेता कोरफडीपासून ज्यूस बनवण्याचा प्रक्रीया उद्योग कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा ठरू शकतो. एलोवेरा ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथम, पिकलेली कोरफडीची पाने घेतली आणि ती चांगली धुतली जाते. त्यानंतर टोके कापून आतील जेल बाहेर काढले जाते. जेल एका ब्लेंडरमध्ये ठेवले आणि ते गुळगुळीत होईपर्यंत मिश्रण केले जाते. पुढे जेलची चव चांगली आणि जास्त काळ टिकण्यासाठी त्यामध्ये पेक्टिनेस, सायट्रिक ऍसिड आणि ऍस्कॉर्बिक ऍसिड मिसळले जाते. त्यानंतर रस मिळविण्यासाठी मिश्रण फिल्टर करून ते विक्रीसाठी बाटल्यांमध्ये ठेवले जाते.

पापड उद्योग : सध्या अनेक घरांमध्ये तिखट, पापड, कुरडया करण्यासाठी महिलांची लगबग सुरु आहे. पण केवळ उन्हाळी काम म्हणून न बघता याला व्यवसायाचेही स्वरूप देता येऊ शकते. विशेष म्हणजे असा गृहउद्योग देशातील अनेक महिला करतात. असा व्यवसाय स्थापन करण्यासाठी सरकारकडून अनुदान देखील मिळते. पापड बनवणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. पापड बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या डाळी जसे की उडीद डाळ, मूग डाळ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिश्रण वापरू शकतात. याशिवाय मागणीनुसार 10, 20 किंवा 40 पापडांच्या पॅकेटमध्ये विकू शकतात. मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक आणि पूर्णपणे ऑटोमॅटिक असे पापड उद्योगांचे विविध प्रकार आहेत.

नाचणी बिस्कीटे : देशात तृणधान्य आणि भरडधान्यांना मोठ्या प्रमणात चालना देण्यात येत असून, त्यासाठी वेगवेगळ्या सरकारच्या योजनाही आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या मेदयुक्त पदार्थ टाळण्यासाठी पर्याय म्हणून तृणधान्यांना पसंती दिली जाते. सध्या मिललेट्स पासून प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. तसेच स्थानिक स्तरावर मार्केट ही लगेच उपलब्ध होते.याशिवाय प्रक्रीया उद्योगांना सरकार अनुदान देत असल्याने कमी खर्चात नाचणी किंवा मिलेटपासून बिस्कीटे बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला फायद्याचा ठरु शकतो.नाचणी_बिस्किटांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नाचणी, शुद्ध तूप, लोणी, साखर अथवा गूळ, बेकिंग पावडर, व्हॅणीला पावडर, पॅकेजिंग साहित्य, ईत्यादी कच्चामाल वापरला जातो.

लोणची व्यवसाय : भारतीय संस्कृतीमध्ये लोकांना जेवणात तोंडी लावायला लोणचे लागते. आंबटगोड लोणच्यांनी जेवणाची लज्जत वाढतेच पण व्यवसाय म्हणूनही हा कमी खर्चाचा आणि नफा मिळवून देणारा लघूउद्योग आहे. कैरी, लिंबू, हळद, मिरची अशा विविध पदार्थांपासून लोणची बनवण्याचा व्यवसायही तुम्हाला करता येऊ शकतो. कैरीचे लोणचे, लिंबू लोणचे, मिरचीचे लोणचे, लिंबू-मिरचीचे लोणचे, करंवदे लोणचे, आवळा लोणचे, हळदी लोणचे, फणस लोणचे, आल्याचे लोणचे असे विविध प्रकारचे लोणचे भारतात आढळतात.

error: Content is protected !!