Force Tractors : फोर्स कंपनीचा ‘हा’ छोटा ट्रॅक्टर, करेल तुमची आर्थिक भरभराट; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय कृषी क्षेत्रासह ट्रॅक्टर निर्मिती उद्योगात ‘फोर्स’ या ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचे (Force Tractors) मोठे नाव आहे. फोर्स कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये चांगल्या कार्यक्षमतेसाठी आणि शक्तिशाली म्हणून ओळखले जातात. शेती आणि व्यावसायिक अशा दोन्ही उपयोगांसाठी कंपनीचे सर्वच ट्रॅक्टर उत्तम मानले जातात. त्यामुळे आता तुम्ही एखादा छोटा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर फोर्स कंपनीचा ‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ (Force Tractors) छोटा ट्रॅक्टर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरणार आहे. हा ट्रॅक्टर कंपनीने फळबाग क्षेत्र असलेल्या किंवा मोठ्या ट्रॅक्टर खरेदी न करू शकणाऱ्या मध्यम शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे.

‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ बद्दल (Force Tractors ORCHARD DELUXE Mini Tractor)

फोर्स कंपनीने ‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ (Force Tractors) हा आपला ट्रॅक्टर 1947 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडर इंजिनमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे. त्याला वॉटर कुलिंग सिस्टीम देण्यात आली असून, तो 27 एचपी क्षमतेसह उपलब्ध आहे. या आपल्या छोट्या ट्रॅक्टरला कंपनीने ड्राय एअर क्लिनर दिलेला आहे. जो मशीनचे धूळ व माती यापासून संरक्षण करतो. फोर्स कंपनीचा ‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ हा ट्रॅक्टर कमीत-कमी 23.2 एचपी पीटीओ पॉवर आणि 2200 आरपीएमची निर्मिती करतो. या ट्रॅक्टरला कंपनीने 29 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. ज्यामुळे एकदा डिझेल भरल्यास तुम्हाला मोठया कालावधीपर्यंत तुमचे शेतातील काम करणे शक्य होते. आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला कंपनीने 1000 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता प्रदान केलेली आहे. तसेच या ट्रॅक्टरचे वजन 1480 किलो इतके आहे. फोर्स कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2975 एमएम लांबी आणि 1450 एमएम रुंदीसह 1585 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केले आहे.

काय आहे वैशिष्ट्ये?

‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ हा ट्रॅक्टर (Force Tractors) तुम्हाला सिंगल ड्रॉप आर्म मेकॅनिकल आणि पॉवर स्टीयरिंग या दोन्ही प्रकारात पाहायला मिळतो. ज्यामुळे तो खडबडीत रस्त्यांवर देखील अगदी चांगल्या पद्धतीने चालकाला ड्राइव्ह करण्यास मदत होते. या आपल्या छोट्या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस ८ आणि मागील बाजूस ४ गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे. या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला ड्राय ड्युअल क्लच प्लेट पाहायला मिळते. जी इझी शिफ्ट कॉन्स्टंट मेश टाइप ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहे. आपल्या या ट्रॅक्टरला कंपनीने पूर्णपणे ऑइल इमर्जड मल्टी प्लेट शिल्ड डिस्क प्रकारात देण्यात आले आहे. ज्यामुळे संपूर्ण उतारावर देखील ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. ‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 5.00 X 15 आकारात तर मागील बाजूस 9.5 X 24 आकारात तयार दिलेले आहेत.

किती आहे किंमत?

फोर्स कंपनीने आपल्या या ‘फोर्स ऑर्चर्ड डीलक्स’ ट्रॅक्टरची (Force Tractors) किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, अत्यंत अल्प निर्धारित केली आहे. कंपनीने या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 5.10 लाख ते 5.25 लाख रुपये इतकी निश्चित केलेली आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे ऑन रोड किमतीमध्ये वेगवेगळया भागात बदल असू शकतो. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 3000 तास किंवा 3 वर्ष जे आधी संपेल. तितक्या कालावधीसाठी वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!