Forest Farming : पैशाची झाडे; संयमाने शेती केल्यास काही वर्षात मिळेल भरभरून उत्पन्न!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपरिक शेतीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे (Forest Farming) वळत आहे. तुम्ही सुद्धा शाश्वत शेतीच्या माध्यमातून संयमाने कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, याशिवाय राज्य सरकारकडूनही वनशेतीला (Forest Farming) प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतात, बांधावर वृक्ष लागवडीसाठी अनुदान दिले जात आहे.

मात्र अशी कोणती झाडे आहेत की ज्या माध्यमातून तुम्ही वनशेती (Forest Farming) करू शकता. आणि त्यातून चांगली कमाई करू शकता. तर महोगनी, निलगिरी, सागवान या तीन झाडांची लागवड करून 10 ते 12 वर्षात उत्पादित होणाऱ्या लाकडांपासून चांगली कमाई केली जाऊ शकते. महोगनी, निलगिरी, सागवान या तीनही झाडांची आपली विशिष्ट विशेषतः आहे. यातील काही झाडांचे सर्व भाग विकले जातात. तर काहींचे लाकूड विकून चांगले पैसे मिळतात. काही झाडांच्या लाकडापासून कागद तयार होतो. तर काही झाडांचा उपयोग दैनंदिन उपयोगात केला जातो. चला तर मग जाणून घेऊया महोगनी, निलगिरी, सागवान या तीन झाडांबद्दल…

महोगनी (Forest Farming Cultivate With Patience)

महोगनी झाड हे खूप मौल्यवान असते. हे लाकूड ना पाण्याने सडते, ना कुजते, ना तुटते. या गुणधर्मामुळे त्याचा उपयोग जहाज बांधणी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. महोगनीच्या लाकडाचा उपयोग घरे, फर्निचर बनवण्यासाठीही केला जातो. तसेच महोगनीच्या पानापासून आणि इतर उत्पादनापासून रक्तदाब, दमा, कर्करोग यांसारख्या भयंकर आजारावर औषधे बनवले जाते. यामुळे महोगनीच्या झाडांना बाजारामध्ये खूप मागणी असते. महोगनीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते. संयमाने यातून मोठी कमाई केली जाऊ शकते. महोगनीच्या लाकडाला सध्या बाजारामध्ये 2400 रुपये ते 2500 रुपये प्रति घनफुट भाव मिळतो.

निलगिरी

एक हेक्टरमध्ये निलगिरीची 3000 झाडांची लागवड केली जाऊ शकते. या झाडांच्या वाढीसाठी सुमारे पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. एक झाड सुमारे 350 ते 400 किलो लाकूड देते. हे लाकूड बाजारामध्ये पाच रुपये ते सात रुपये प्रति किलो प्रमाणे विकले जाते. या लाकडाचा वापर इंधन, फर्निचर आणि कागदाचा लगदा तयार करण्यासाठी होतो. निलगिरीच्या पानांमध्ये औषधांचा गुणधर्म असतो. या पानापासून तीव्र गंध असलेले युकॅलिप्टस ऑइल तयार होते जे डोके दुखी, दात दुखी आदी विकारात गुणकारी असते. निलगिरीचे झाड हे अल्प पाऊस असलेल्या प्रदेशात उंचच उंच वाढणारे झाड आहे. हे झाड झपाट्याने वाढते. तसेच जमिनीतील पाणी खूप मोठ्या प्रमाणात शोषून घेते. निलगिरीच्या झाडाचे खोड पांढरे असते. म्हणून त्याला सफेदा नावाने देखील ओळखले जाते.

सागवान

सागाच्या लागवडीसाठी विशेष प्रकारच्या मातीची आवशक्यता नसते. चिकणमाती असलेल्या जमिनीत याची लागवड सहज करता येते. सागवान 200 वर्षांपर्यंत जगते. त्याचे लाकूड अतिशय मजबूत असून, ते बाजारात महागड्या दराने विकले जाते. याचा उपयोग फर्निचर, प्लायवूड, जहाजे, रेल्वेचे डबे, औषधी, औषधी इत्यादी बनवण्यासाठी होतो. सागवान लाकडाला देश-विदेशात मोठी मागणी आहे. सध्या केवळ 5 टक्के मागणी पूर्ण होत आहे. एक एकर शेतात सागवानाची 120 रोपे लावता येतात. सागवानाची झाडे 15 वर्षांनी काढणी योग्य होतात. सध्या सागवान लाकडाचा भाव 2000 ते 2500 रुपये प्रति घनफूट आहे. त्यामुळे तुम्हीही या तीन झाडांच्या लागवडीतून संयम ठेऊन काही वर्षांमध्ये चांगली कमाई करू शकतात.

error: Content is protected !!