Forest Farming : ‘या’ वनस्पतीची शेती करा; महिलांच्या शृंगार साधनांसाठी वापरले जाते तिचे बी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांची (Forest Farming) भावना असते की, गहू, धान, मका, सोयाबीन, कापूस पारंपारिक पिकांसह फळे व भाजीपाल्याच्या पिकांमधुन शेतकऱ्यांना अधिकची कमाई मिळते. मात्र शेतकरी वनपस्ती पिकांची लागवड करून देखील मोठ्या प्रमाणात कमाई करू शकतात. आज आपण अशाच एका वनस्पती पिकाबाबत जाणून घेणार आहोत, ज्यापासून शेतकऱ्यांना लाखोंची कमाई करण्यास मदत होणार आहे. या वनस्पतीच्या (Forest Farming) वापरापासून महिलांच्या शृंगारासाठीच्या सिंदूर, लिपस्टिक, नेल पॉलिश, केसांची मेहंदी आणि साबण बनवली जाते.

काय आहे वनपस्तीचे नाव? (Forest Farming Crop For Farmers)

बिक्सा ओरेलाना असे या वनस्पतीचे नाव असून, डोंगराळ भागामध्ये या वनस्पतीची लागवड (Forest Farming) केली जाते. विशेष म्हणजे डोंगराळ भागात वाढणाऱ्या ही वनस्पती झुडपांच्या स्वरूपात असते. या सिंदूर आणि लिपस्टिक बनवल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या प्रॉडक्ट्सला परदेशात मोठी मागणी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ‘बिक्सा ओरेलाना’ झाड साधारणत: 7 ते 8 फूट उंच असतात. हे मुख्यतः डोंगराळ भागात आढळतात.

औषधी वनस्पती म्हणूनही वापर

बिक्सा ओरेलाना ही वनपस्ती 30 अंशांपर्यंत तापमान असलेल्या प्रदेशात झपाट्याने वाढते. भारतातील मध्य-दक्षिण भागातील राज्यांमध्ये या वनस्पतीची लागवड केली जाऊ शकते. तिची लागवड करण्यासाठी प्रामुख्याने डिसेंबर आणि जानेवारी हा सर्वोत्तम काळ आहे. तथापि, बरेच लोक जुलै ते सप्टेंबर दरम्यान ‘बिक्सा ओरेलाना’ या वनस्पतीची लागवड करतात. विशेष म्हणजे या सिंदूर वनस्पतीला इंग्रजीमध्ये ‘लिपस्टिक ट्री’ असेही म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, लिपस्टिकच्या झाडाच्या बियांपासून नैसर्गिक सिंदूर तयार होतो. यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. त्वचेचे आजार, त्वचेची जळजळ, चिरणे, कावीळ अशा अनेक आजारांवर औषध म्हणून याचा उपयोग होतो.

हे आहेत औषधी गुणधर्म

‘बिक्सा ओरेलाना’ च्या बियांपासून कॉस्मेटिक वस्तू बनवल्या जातात. त्यातून नेल पॉलिश, सिंदूर, केसांची मेंदी आणि लिपस्टिक तयार केली जाते. याशिवाय, साबण तयार करण्यासाठी देखील या वनस्पतीचा वापर केला जातो. यासोबतच बटर आणि सॉस बनवण्यासाठीही ही वनस्पती खूप उपयोगी आहे. शेतकऱ्यांनी ‘बिक्सा ओरेलाना’ची लागवड केल्यास उत्पादनात वाढ होऊन महिलांना रसायनेयुक्त सिंदूरच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत नाही. वास्तविक, रसायनांचा वापर सिंदूरमध्ये असल्यास, महिलांना त्वचेच्या विकारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना या वनपस्तीच्या लागवडीतून मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. एका सिंदूरच्या झाडापासून एका वेळी एक किंवा दीड किलो सिंदूर फळ मिळते. त्याची किंमत 400 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त असते.

error: Content is protected !!