FPO Success Story: अल्पभूधारक शेतकर्‍यांनी जागतिक बाजार पेठेसाठी लॉन्च केला ‘Aamoré’ हापूस आंब्याचा प्रिमियम ब्रँड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने (FPO Success Story) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मालकीचा नवीन डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) ब्रँड Aamoré’ लाँच केला आहे. या ब्रँडचा उद्देश जागतिक पातळीवर भारतीय शेतीबद्दल विचारधारा बदलणे आणि प्रसिद्ध हापूस आंब्याला प्रसिद्धी मिळवून देणे (FPO Success Story) हे आहे.

Aamoré’ हे 300 हून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या (Smallholder Farmer) समुदायाने तयार केलेले ब्रँड आहे. जगभरातील हापूस (Alphonso Mango) प्रेमी लोकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आणि फ्रेश आणि उच्च दर्जाचा हापूस आंबा पुरविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे (FPO Success Story). हा उपक्रम स्थानिक शेतकऱ्यांना निर्यातक्षम फळे (Fruit Export) तयार  करण्यासाठी आवश्यक साधने आणि ज्ञान प्रदान करून सक्षम बनवतो. यामध्ये अत्याधुनिक पॅक हाऊस ऑपरेशन्स उभारणे, प्रत्येक आंब्यासाठी अत्याधुनिक स्कॅनिंग तंत्रज्ञान वापरणे, हापूस मधील साका समस्या (Mango Spongy Tissue) नष्ट करण्यासाठी धोरणे अंमलात आणणे आणि शेतातून थेट ग्राहकांपर्यंत सर्वसमावेशक योग्य फळे पोहचेल हे सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.

प्रायोगिक वर्षात, Aamoré हापूस आंबे जागतिक स्तरावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असून ते  यूएस, युरोप, यूके, अबू धाबी आणि भारतातील निवडक शहरांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचतील. हे जागतिक स्तरावर भारतीय अल्पभूधारक शेतकर्‍यांनी टाकलेले हे एक धाडसी पाऊल आहे (FPO Success Story), जे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्यातील क्षमता दर्शविते. दिल्ली एनसीआर क्षेत्रातील ग्राहक सुद्धा  आता त्यांच्या aamore.co.in या वेबसाइटवर हापूस आंब्याची ऑर्डर देऊ शकतात.

Aamoré’ चे सदस्य शेतकरी मंगेश कृष्ण कुर्ते यांनी सांगितले आहे की त्यांना वडि‍लांकडून शेतीचा वारसा मिळाला असून गेली 10 वर्षे ते शेतकरी आहेत. त्यांच्या 15 गुंठे बागेत आंब्याची 120 झाडे अति घनता पद्धतीने लावलेली आहेत. आंब्याची लागवड करून आता तीन  वर्ष झाली आहे आणि त्यांच्या झाडांवर आंबेही लागले आहेत. Aamoré द्वारे उद्योजक बनणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कंपनीने गुणवत्ता तपासणी, पॅकिंग आणि ब्रँड जगभरात नेण्यासाठी भरपूर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यावर्षी त्यांच्या आंब्याला खूप चांगली किंमत मिळण्याची अपेक्षा आहे (FPO Success Story) असेही ते म्हणाले.

“पावसानंतर आंब्यामध्ये कासा (स्पॉन्जी टिश्यू) तयार होतात यामुळे आंब्याचा दर (Mango Rate) आणि प्रत (Mango Quality) कमी होते. त्यामुळे त्यांनी पाणी आणि खतांचा योग्य वापर करून ही समस्या कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजूनही ही समस्या पूर्णपणे सुटू शकत नाही. कापणीनंतर, आमोरचे अत्याधुनिक पॅक हाऊस स्पॉन्जी टिश्यू समस्या दूर करण्यासाठी आमचे आंबे पूर्णपणे स्कॅन करते. अशा प्रकारे, आम्ही ग्राहकांना अधिक चांगले मूल्य देऊ शकतो आणि कोकण आंब्याला मिळालेली प्रसिद्धी अजून वाढवायची आहे असे विनायक सुरेश साळुंके म्हणाले.

कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी रवीश चव्हाण म्हणाले, “आमोरे हे नावीन्यपूर्ण शेती आणि सक्षमीकरण याचे उत्तम उदाहरण आहे. Aamoré ची जागतिक बाजारपेठेत ओळख निर्माण करून आंब्याचे प्रिमियम उत्पादनच द्यायचे, सोबतच अल्पभूधारक शेतीतील पारंपरिक आव्हाने यांना सुद्धा मत द्यायची आहे. आमचे शेतकरी केवळ शेती करणारे नाहीत; ते दूरदर्शी उद्योजक आहेत ही प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण करायची आहे.

Aamoré दोन मुख्य उद्देश म्हणजे शेतीचे शाश्वत व लक्षणीय उच्च उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि जगभरातील ग्राहकांना अस्सल भौगोलिक संकेत (GI) म्हणून प्रमाणित उच्च दर्जाच्या हापूस आंब्याच्या चवीचा एक अतुलनीय अनुभव देणे हे आहे.

कोकण रत्नागिरी भूमी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी (Konkan Ratnagiri Bhoomi Agro Producer Company) हा भारतातील अल्पभूधारक शेतकर्‍यांचे जीवनमान सुधारण्यासाठी समर्पित शेतकर्‍यांची कंपनी असून नाविन्यपूर्ण कृषी पद्धती, गुणवत्ता आणि शाश्वतता अशी त्यांना ओळख (FPO Success Story) निर्माण करायची आहे.

error: Content is protected !!