Free Electricity : उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना मोफत वीज; योगी सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना योगी सरकारने (Free Electricity) मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्तावाला आज (ता.5) मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामुळे योगी सरकारच्या या निर्णयाचा उत्तरप्रदेशातील जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. वर्ष 2022 मध्ये झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज (Free Electricity) देण्याचे आश्वासन बीजेपी सरकारने दिले होते. ते पूर्ण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीनंतर म्हटले आहे.

वीज बिलाची कटकट मिटली (Free Electricity For Farmers In Uttarpradesh)

महाराष्ट्रात बोअरवेल आणि विहिरींद्वारे एकत्रिपणे सिंचन होते. याउलट उत्तरप्रदेश या राज्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांकडे बोअरवेलच्या माध्यमातून थेट सर्वाधिक सिंचन केले जाते. उत्तरप्रदेशात पिकांना पाणी देण्यासाठी बोअरवेल हा प्रमुख सिंचन स्रोत आहे. ज्यामुळे योगी सरकारने शेतकऱ्यांच्या बोअरवेलसाठी संपूर्ण मोफत वीज (Free Electricity) देण्याची घोषणा केली आहे. परिणामी आता राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना शेतीसाठीचे वीज बिल भरावे लागणार नाही. असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात 2400 कोटींची तरतूद

दरम्यान, उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प 5 फेब्रुवारी 2024 रोजी विधासभेत सादर करण्यात आला होता. ज्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्यासाठी 2400 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय योगी सरकारने अर्थसंकल्पात कालव्यांमधून शेतकऱ्यांना मोफत पाणी देण्यासाठी 1100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याआधी सरकारने खासगी बोअरवेल घेण्यासाठी मर्यादा घातली होती. मात्र आता ही मर्यादा हटवण्यात आली असून, नव्याने बोअरवेल घेऊ इच्छिणाऱ्या एक लाखहुन अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतीतुन भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी पाणी, वीज या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. शेतीमध्ये जितके महत्व सुपीक जमिनीला आहे. अगदी तितकेच महत्व विजेला आहे. वेळेवर वीज आणि पाणी उपलब्ध होत असल्यास, पिकांचे आरोग्य चांगले राहून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळण्यास मदत होते. त्यामुळे आता उत्तरप्रदेशात शेतीसाठी मोफत वीज मिळणार असल्याने, शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

error: Content is protected !!