Fruit Crops Production : यावर्षी टोमॅटो, कांदा उत्पादनात घट; बटाटा उत्पादन वाढणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2022-23 यावर्षी देशातील फळ पिकांच्या उत्पादनात (Fruit Crops Production) दोन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यावर्षी देशात 355.25 दशलक्ष टन इतके फळांचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 347.18 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. यावर्षी देशात फळ पिकांच्या उत्पादनाला हवामान बदलाचा फटका बसलेला असतानाही या पिकांचे उत्पन्न (Fruit Crops Production) वाढले आहे. यामध्ये देशातील कृषी संशोधन संस्था आणि शेतकऱ्यांची मेहनत असलयाचे कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे.

कृषी मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, “यावर्षी 2022-23 यावर्षी 109.53 टन फळांचे उत्पादन (Fruit Crops Production) होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 107.51 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. तर फळभाज्यांच्या उत्पादनातही वाढ होऊन ते 288.88 दशलक्ष टन इतके होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी 2021-22 मध्ये 209.14 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षी फळांचे आणि फळभाज्यांचे मिळून एकत्रितपणे 355.25 दशलक्ष टन इतके उत्पादन होण्याचा अंदाज आहे.”

टोमॅटो, कांदा उत्पादनात घट (Fruit Crops Production Increased)

फळभाज्यांच्या उत्पादनात बटाटा, टोमॅटो आणि कांदा ही प्रमुख पिके आहेत. यामध्ये यावर्षी बटाटा उत्पादनात वाढ , तर टोमॅटो आणि कांदा उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत घट होणार असल्याचे कृषी मंत्रालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे. यावर्षी 60.22 दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन होऊ शकते. जे मागील वर्षी 56.18 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. यावर्षी 20.37 दशलक्ष टन टोमॅटो उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे मागिल वर्षी 20.69 दशलक्ष टन नोंदवले गेले होते. तर यावर्षी देशातील कांद्याचे उत्पादन 30.2 दशलक्ष टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी 31.7 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात बटाटा उत्पादनात वाढ तर टोमॅटो आणि कांदा उत्पादनात अल्प घट होण्याचा अंदाज कृषी मंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे.

लागवडीखालील क्षेत्रात वाढ

इतकेच नाही तर कृषी मंत्रालयालाच्या आकडेवारीनुसार, फळ पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र यावर्षी 28.04 दशलक्ष हेक्टरवरुन 28.34 हेक्टरपर्यंत वाढले आहे. याउलट फळभाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात 11.37 दशलक्ष हेक्‍टरवरून, 11.36 हेक्‍टरपर्यंत घसरण झाल्याचे कृषी मंत्रालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

error: Content is protected !!