Fruit Farming : फळ शेतीचा वेगाने विस्तार; बाजारपेठेचा अंदाज घेण्याचे कृषिमंत्र्यांचे आवाहन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : फळबाग शेतीमध्ये (Fruit Farming) भारताने मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, देशातील फळबाग क्षेत्र वेगाने वाढत आहे. यावर्षी 2022-23 मध्ये देशातील फळांचे उत्पादन 350 दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे देशातील फळबाग शेतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटले आहे. ते बंगळुरू येथे (Fruit Farming) एका कार्यक्रमात बोलत होते.

कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी बंगळुरू येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेला (आयआयएचआर) भेट दिली. त्यावेळी त्यांनी काही शेतकरी, कृषी क्षेत्राचे विद्यार्थी यांची भेट घेत संवाद साधला. यावेळी आयआयएचआरकडून फळबाग शेतीसाठीचे (Fruit Farming) काही सामंजस्य करार देखील करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन संस्था बंगळुरूकडून 54 फळबाग पिकांवर काम सुरू आहे. ही फळपिके देशातील शेतकऱ्यांसाठी विकसित करण्यात येत आहे. उष्णकटिबंधीय फळे, भाजीपाला आणि फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या 54 पिकांच्या एकूण 300 प्रजाती विकसित करण्यात येत आहेत. याशिवाय संस्थेकडून आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यांसाठी विशेष काम केले जात आहे. हे पाहून केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी संस्थेचा कामावर समाधान व्यक्त केले आहे.

फळबाग शेतीचे सर्वाधिक योगदान (Fruit Farming Rapid Expansion)

कृषी अर्थव्यवस्थेमध्ये देशातील फळबाग शेतीचे योगदान 33 टक्के इतके आहे. ज्यामध्ये आणखी वाढ केली जाऊ शकते. फळे आणि भाजीपाल्याच्या पिकांमध्ये शेतकऱ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत, असेही कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी यावेळी म्हटले आहे. देशांतर्गत बाजारातच नाही तर वैश्विक बाजारातही गुणवत्ता राखत आपण जागतिक बाजारपेठ काबीज करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

फळशेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा

फळबाग शेती ही देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्वपूर्ण घटक मानली गेली आहे. त्याद्वारे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. फळबाग शेती शेतकऱ्यांना आपला आर्थिक विकास घडवून आणण्यास मदत करते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात देशातील फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, यावर्षी देशात एकूण फळ पिकांचे उत्पादन हे 350 दशलक्ष टनांपर्यंत पोहचले आहे.

मानकांअनुरुप उत्पादन घ्यावे

फळशेती करण्यासोबतच फळांची साठवणूक, फळांवर प्रक्रिया करणे आणि फळांची मार्केटींग करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वोत्तम पद्धती वापरून, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार फळांचे उत्पादन घ्यावे. जेणेकरून भारतीय फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करण्यास मदत होईल. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक भरभराट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

error: Content is protected !!