Fruit Orchard Care: दुष्काळात अशी घ्या फळबागेची काळजी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या परिस्थितीत फळबागेची काळजी (Fruit Orchard Care) घेणे महत्त्वाचे आहे. कारण राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) आणि गारपीट (Hailstorm) स्थिती असली तरी काही ठिकाणी तापमानात वाढ (Heat Waves) होताना दिसून येत आहे. राज्यात पुढील काळात तापमानात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. दुष्काळी परिस्थितीत फळबागेची (Fruit Orchard Care) कशी काळजी घ्यावी याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (VNMKV Parbhani) अंतर्गत येणाऱ्या परभणी कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय जाणून घेऊ या.

ठिबक सिंचन पद्धती (Drip Irrigation) 

उन्हाळ्यामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे 50 ते 60 टक्के पाण्याची बचत होते. उत्पादनात 20 से 25 टक्के वाढ मिळू शकते.

जैविक आच्छादन (Organic Mulching)

फळबागेत जैविक आच्छादनाकरिता पालापाचोळा, लाकडी भुसा, वाळलेले गवत, उसाचे पाचट, सोयाबीनचा भुसा, गव्हाचे काड अशा सेंद्रिय संसाधनांचा वापर करावा. जैविक आच्छादनाची जाडी 12 ते 25 सें.मी. असावी. जैविक आच्छादनामुळे उन्हाळ्यात दोन पाण्याच्या पाळीतील अंतर वाढवता येतो व जमिनीचे तापमान नियंत्रित होते.

मडका सिंचन पद्धती (Matka Irrigation)

2 ते 3 वर्षाच्या झाडांसाठी 5 ते 7 लिटर तर मोठ्या झाडांसाठी 10 ते 15 लिटरची मडकी वापरावीत. मडकी छिद्रांकित व कमी भाजलेली असावीत. भाजलेल्या मडक्याच्या खालील बाजूस छिद्र पाडून त्यामध्ये कापडाची चिंधी किंवा नारळाची शेंडी बसवावी.

बाष्परोधकांचा वापर (Fruit Orchard Care)

पानातून जाणारे पाणी वाष्परोधकांचा वापर करून कमी करता येते. यासाठी पर्णरंद्रे बंद करणारी फिनील मरक्यूरी अॅसिटेट, अॅचसिसिक अॅसिड तर पानावर पातळ थर तयार करणारे केओलीन, सिलिकॉन ऑईल, मेण इत्यादी बाष्परोधकांचा वापर करावा.

बोर्डोपेस्टचा वापर

उन्हामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे खोडावरील साल तडकून बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खोडाला बोडोपेस्ट लावावी. 1 ते 2 मीटर उंचीपर्यंत बोडों पेस्ट लावावी, बोडोपेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावर्तित होतात, खोडाचे तापमान कमी राहते, साल तडकत नाही (Fruit Orchard Care).

खतांची फवारणी

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे पाण्याचे प्रमाण कमी होऊन पानात कमी अन्नांश तयार होतात. यावेळी 1 % टक्का पोटॅशियम नायट्रेट व 2 टक्के डीएपी यांची 25 – 30 दिवसाच्या अंतराने एक आड एक फवारणी करावी. ज्यामुळे अन्नांश तयार होण्याची क्रिया गतिमान होऊन झाडे जमिनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात.

बागेसाठी वारारोधक (Wind Breakers)

उन्हाळ्यामध्ये अति उष्ण वार्‍यामुळे बागेमध्ये (Fruit Orchard Care) बाष्पि‍भवनाचे प्रमाण वाढून बागेस नुकसान होऊ शकते. यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती गोणपाट, जुन्या साड्या, हिरवे शेडनेट, खताच्या पिशव्या यांचा आडोसा करून उष्ण हवा बागेत जाणार नाही, अशा पद्धतीने वारा रोधके लावावीत.

सावलीसाठी मांडव

नवीन लागवड केलेल्या फळझाडांना पहिल्या 1 ते 2 वर्ष उन्हापासून संरक्षण देण्यासाठी सावली करावी (Fruit Orchard Care). झाडाच्या सर्व बाजूंना 3 फुट लांबीच्या बांबू, कामठवा, गवत यांचा वापर करून सावलीसाठी मांडव तयार करावा. वाळलेल्या गवताऐवजी बारदाना किंवा शेडनेटचा वापर देखील उपलब्ध असेल तर करू शकता. 

जैविक वारारोधके (Wind Breakers)

उन्हाळ्यात जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे बागेभोवती सुरुवातीलाच शेवरी, मलबेरी, चिलार, चिंच, सुबाभूळ, ग्लिरीसीडीया, सरु, शेर, निवडुंग यापैकी उपलब्ध वनस्पतींची कुंपणाकरिता लागवड करावी. यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन फळबागांचे संरक्षण होते.

पानोळा कमी करणे

पानातून पणर्णोत्सर्जनाद्वारे वाया जाणारे पाणी कमी करण्यासाठी झाडाच्या खालच्या व आतील भागातील अनावश्यक फांद्या व पानांची रोगमुक्त सिकेटरचा वापर करून विरळणी करावी. यामुळे पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी होऊन झाडांना लागणार्‍या पाण्याची गरज कमी होते. 

फळांची विरळणी

पाण्याच्या कमतरतेमुळे उन्हाळ्यात झाडांना लागणारे पाणी देणे शक्य होत नाही. झाडावरील फुले, फळे यांच्यामुळे झाडांना अतिरिक्त अन्नपाणी लागते. त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागवून झाडे जगवण्यासाठी उन्हाळी बहार न घेता झाडावरील फुले, फळे यांची विरळणी करावी.

शेततळ्यातील पाणी बचत

शेततळ्यातील एकूण जल साठ्यापैकी 40 ते 42 % पाण्याचे बाष्पीभवन होते. मात्र हे होऊ नये यासाठी निंबोळी किंवा एरंडीच्या तेलाचा तवंग पाण्यावर पसरावा. 30 ते 35 चौ. मी पाण्याच्या पृष्ठभागासाठी 1 ली. तेलाची गरज भासते. बाष्पीभवन द्वारे होणारा पाण्याचा नाश कमी करून अधिकचे पाणी फळबागेसाठी (Fruit Orchard Care) वापरात घ्यावे.

error: Content is protected !!