Fulvic Acid : पिकांच्या उत्पादनवाढीसाठी ‘या’ ऍसिडची फवारणी करा; खतांचा खर्च होईल कमी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी शेती करताना पिकांसाठी पोषकतत्वांचा (Fulvic Acid) समावेश असणारी विविध प्रकारची औषधे वापरत असतात. यात ह्यूमिक ऍसिड हा शब्द सर्वच शेतकऱ्यांच्या परिचयाचा आहे. मात्र, आज आपण शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘फुलविक ऍसिड’ या पोषक औषधाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ‘फुलविक ऍसिड’ हे प्रामुख्याने ह्यूमिक ऍसिडच्या मदतीनेच तयार केले जाते. मात्र, या ऍसिडचे फायदे ह्यूमिक ऍसिडपेक्षा थोडे वेगळे आहेत. इतकेच नाही तर पिकांसाठी ‘फुलविक ऍसिड’चा (Fulvic Acid) वापर केल्यास खतांवरील खर्चात जवळपास 50 टक्क्यांपर्यंत बचत होते.

प्रकाश संश्लेषणासाठी करते मदत (Fulvic Acid To Increase Crop Yield)

फुलविक ऍसिड (Fulvic Acid) तयार करण्यासाठी प्रामुख्याने सर्वप्रथम 200 लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घेऊन, त्यात 195 लिटर पाणी घ्यावे. या पाण्यात 3 किलो फुलविक ऍसिड टाकावे. हे मिश्रण काठीने ढवळावे. संपूर्णपणे विरघळेपर्यंत हे द्रावण ढवळत राहावे. प्रामुख्याने फुलविक ऍसिडचा वापर हा तयार केल्यानंतर लगेचच करावा. फुलविक ऍसिडचे हे द्रावण पिकांना प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी मदत करते. त्यामुळे या द्रावणाची पिकांवर फवारणी केल्यास, उत्पादनात भरघोस वाढ होते.

फुलविक ऍसिडचे फायदे?

  • फुलविक ऍसिडच्या (Fulvic Acid) वापरामुळे जमिनीची धूप थांबवण्यास मदत होते.
  • फुलविक ऍसिडचा वापर केल्याने जमिनीतील पीक वाढीसाठी आवश्यक असेलेली सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यास मदत होते.
  • याच्या वापरामुळे जमिनीतील पोषक तत्वांची वाढ होते. याशिवाय खतांच्या खर्चात 50 टक्क्यांपर्यंत बचत होते.
  • पावसाळयाच्या दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असते. ज्यामुळे अशा काळात या फुलविक ऍसिडच्या मदतीने पिकांना प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी मदत होते.
  • फुलविक ऍसिड फळपिकांसाठी वापरल्यास फळांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

कधी करावा वापर?

  • फुलविक ऍसिडची फवारणी ही फळपिके, पालेभाज्या आणि अन्य पिकांच्या सर्व वाढीच्या टप्प्यांवर केली जाऊ शकते.
  • यात प्रामुख्याने शेतकरी फुलविक ऍसिड रोपांना, पिकांच्या फुटवा करतेवेळी, पिकांना फुले लागण्याच्या वेळी किंवा मग फळधारणा होण्याच्या वेळी या फुलविक ऍसिडची फवारणी पिकांवर केली जाऊ शकते.

किती आणि कसा वापर करावा?

  • कृषी तज्ज्ञांच्या मते, 10 लिटर फुलविक ऍसिडचे द्रावण हे प्रति एकरी पिकाला ठिबक किंवा मग पाणी देताना मुळाशी द्यावे.
  • तसेच फवारणी करायची असल्यास 0.5 ग्रॅम फुलविक ऍसिड किंवा 1 लिटर फुलविक ऍसिडचा डबा घेऊन, 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
error: Content is protected !!