Gajendra Reda : इंदापूरात गजेंद्र रेड्याची हवा, दीड टन वजन; पाहण्यासाठी तुफान गर्दी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात 24 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत (Gajendra Reda) इंदापूर, कृषी उत्पन्न बाजार समितीने कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात कृषी उपयोगी अवजारे, विविध जनावरे, अन्य कृषी विषयक बाबींचे प्रदर्शन तसेच घोडेबाजार व डॉग शो आयोजित करण्यात आला होता. मात्र या सर्वांमध्ये दीड टन वजनाचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा प्रदर्शनात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गजेंद्र रेड्याला (Gajendra Reda) पाहण्यासाठी उपस्थितांनी मोठी गर्दी केली होती.

आठ वेळा हिंदकेसरी पुरस्कार (Gajendra Reda Crowd To Watch)

बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथील शेतकरी विलास गणपती नाईक व त्यांचा मुलगा ज्ञानदेव नाईक यांनी हा रेडा इंदापूरच्या कृषी प्रदर्शनात आणला होता. याचे वय सहा वर्षे असून, त्याला साडे तीनशे किलोमीटरचा प्रवास करून या प्रदर्शनात आणले होते. जवळपास 30 हजार रुपये भाडे खर्चून बीड, अहमदनगर, राहुरी व इतरत्र त्याला तिकिटावर पाहण्यासाठी आम्ही नेत असतो. मात्र या ठिकाणी बाजार समितीने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी मोफत ठेवले आहे. आठ वेळा गजेंद्रने हिंदकेसरी पुरस्कार मिळविला आहे. असे शेतकरी ज्ञानदेव नाईक यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रासह, कर्नाटक येथे आजवर झालेल्या 25 वेगवेगळ्या प्रदर्शनांत गजेंद्र रेडयाने सहभाग नोंदवला आहे.

सीमेनमधून आर्थिक कमाई

गजेंद्र रेड्याला दररोज 15 लिटर दूध ,तीन किलो सफरचंद ,चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचे पीठ, मकवान कडबा ऊसाचे वाडे असा खुराक लागतो. त्याच्यापासून मिळणाऱ्या सीमेनच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार रुपये घेतले जातात. यातून मोठी आर्थिक कमाई होते. असे शेतकरी विलास गणपती नाईक सांगतात. त्याला राहुरी व पंजाब येथील कंपन्यांनी 80 लाख ते जवळपास दीड कोटी रुपयांना विकत मागितले होते. मात्र आपण त्याला विकणार नसल्याचे विलास नाईक यांनी म्हटले आहे. गजेंद्रचा नावलौकिक झाला असून, लोकांचे आकर्षण कायम ठेवण्यासाठी त्याचा सांभाळ करत असल्याचे ज्ञानदेव नाईक यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!