Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana:  गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसाठी 5.08 कोटीचा निधी मंजूर!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्य सरकारने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana) योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून चार जिल्ह्यांसाठी 5 कोटी 8 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून हिंगोली जिल्ह्यातील 18 संस्थांना 4 कोटी 56 लाख 22 हजार 477 रुपये मिळणार आहेत.

योजनेची अंमलबजावणी (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana)

गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत कामं चालतात. मशीन आणि स्वयंसेवकांच्या कमतरतेमुळे कामे रखडतात. आता ग्रामपंचायतीं मार्फत काम करून मृद व जलसंधारण विभागाकडून तपासणी करतात. कार्यकारी अभियंते देयके जिल्हास्तरावर देतात. जिल्हा जलसंधारण अधिकारी एकत्रित मागणी करतात.

निधी वितरण

हिंगोली: 4 कोटी 56 लाख 22 हजार 477 रुपये (18 संस्था)

वाशिम: 31 लाख 31 हजार 188 रुपये (1 संस्था)

नागपूर: 7 लाख 18 हजार रुपये (1 संस्था)

जालना: 27 लाख 64 हजार 997 रुपये (1 संस्था)

हिंगोलीतील लाभार्थी संस्था

स्वामी विवेकानंद ट्रस्ट, सुकळी

सह्याद्री संस्था, कोठारी, वसमत

पंचमुखी बहुद्देशीय संस्था, पुसेगाव, सेनगाव

नवदुर्गा बहुद्देशीय मंडळ, हराए

जयंतराव पाटील सेवाभावी संस्था, साटंबा, हिंगोली

व्यकटेश संस्था, सांडस, कळमनुरी

समता सर्वांगीन विकास संस्था, डिग्रस वाणी, हिंगोली

जय जिजाऊ शेतकरी मंडळ, जोडतळा

योगेश्वर बहुद्देशीय सेवाभावी संस्था, बीड

सतुगंगा ग्राम सुधार शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचोली

राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्था, उमरा

उगम ग्रामीण विकास संस्था, उमरा

तुळजाभवावी बहुद्देशीय सेवाभावी, अनखळी, औंढा

राजनी शाहू महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था, महाळजगाव

नागनाथ ग्रामीण विकास महिला मंडळ, कंजारा

स्वामी विवेकानंद युवक मंडळ, जोडतळा

गजान महाराज सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, अंजनवाडा

जयपूर्णवाद संस्था, सेलसुरा, कळमनुरी

निधी वितरणाची पद्धत (Galmukt Dharan Galyukt Shivar Yojana)

गाळ काढून पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदानाची खातरजमा केली जाईल. देयकांच्या आधारे निधी वितरण केला जाईल

error: Content is protected !!