Gandul Khat Business : गांडूळ खत निर्मिती उद्योग; उच्च शिक्षित महिलेची वर्षाला 50 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक उच्चशिक्षित तरुण शेती व शेतीआधारित उद्योगांमध्ये (Gandul Khat Business) पाय ठेवत आहे. विशेष म्हणजे यात महिला देखील मागे नसून, शेतीशी संबंधित सर्वच बाबींमध्ये महिला स्वतःला सिद्ध करत आहेत. आज आपण अशाच उच्चशिक्षित महिलेच्या गांडूळ खत व्यवसायातील यशाबद्दल जाणून घेणार आहोत. या महिलेने गांडूळ खत निर्मिती उद्योगामध्ये (Gandul Khat Business) भक्कमपणे पाय रोवले आहे. मागील चार वर्षांपासून त्या या उद्योगाच्या माध्यमातून वार्षिक 50 लाखांची कमाई करत आहे.

उच्च शिक्षणाचा शेतीसाठी फायदा (Gandul Khat Business Woman Earns 50 Lakhs A Year)

ऋचा दीक्षित असे या महिला शेतकऱ्याचे नाव असून, त्या उत्तरप्रदेशातील शाहजहांपुर येथील रहिवासी आहेत. ऋचा यांनी 2011 ते 2015 या कालावधीत जालंधर कृषी विद्यापीठातून बीएससी ऍग्री आणि त्यानंतर नोएडा येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी पुणे येथील एका नामांकित कृषी विषयक कंपनीत काम केले. मात्र, नोकरीत त्यांचे मन रमत नव्हते. अशातच कोरोनाकाळात त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनतर त्या गावी परतल्या. आणि प्रदीर्घ विचारांती त्या 2021 साली गांडूळ खत निर्मिती उद्योगात (Gandul Khat Business) उतरल्या. तत्पूर्वी त्यांनी यु-ट्यूबच्या माध्यमातून या व्यवसायातील सर्व बारकाबे समजून घेतले.

घरपोच पाठवतात खत

ऋचा दीक्षित सांगतात, सुरुवातीला त्यांनी केवळ 60 हजार रुपये इतक्या कमी गुंतवणुकीत छोटेखानी गांडूळ खत निर्मिती उद्योग सुरु केला. त्यासाठी त्यांनी शेड उभारले. 15 ट्रॉली शेणखत विकत घेतले. गांडूळ बीज मागवले. त्यानंतर त्यांनी आपल्या परिसरातील नर्सरी उद्योगक आणि शेतकऱ्यांमध्ये आपल्या गांडूळ खताची मार्केटिंग करून, त्यांना विक्री सुरु केली. गांडूळ खत विक्रीसाठी त्यांनी 1 किलो – 70 रुपये, 2 किलो – 120 रुपये, 5 किलो – 199 रुपये, 10 किलो – 299 रुपये असे पॅकेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय त्यांनी आपल्या गांडूळ खताचा ब्रँड सर्व ऑनलाइन प्लेटफॉर्मवर देखील उपलब्ध करून दिला आहे. ज्या माध्यमातून त्या घरपोच शेतकऱ्यांना गांढूळ खत पाठवतात.

दररोज 500-600 ऑर्डर

शाहजहांपुर जिल्ह्यातील रोजा या छोट्याशा गावात राहणाऱ्या ऋचा दीक्षित सांगतात की, गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये त्यांनी गांढूळ खत निर्मिती उद्योगात चांगली पकड मजबूत केली असून, आपल्याकडे दररोज गांडूळ खतासाठी जवळपास 500 ते 600 लोक ऑर्डर नोंदवत आहे. मागणीचा हाच आकडा ऐन पावसाळ्याच्या हंगामामध्ये एक हजारापर्यंत देखील पोहचतो. याशिवाय परिसरातील काही शेतकरी थेट आपल्या प्लांटवर येऊन गांडूळ खताची खरेदी करत असल्याचे त्या सांगतात.

यंदा 3 कोटींच्या टर्नओव्हरची अपेक्षा

ऋचा दीक्षित सांगतात, आपण या गांडूळ खत निर्मिती उद्योगातून 8 ते 10 जणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात एकूण 50 लाख रुपयांचा टर्नओव्हर आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. अशातच आता आपल्याला येणाऱ्या 2024-25 या वर्षात आपल्या गांडूळ खत निर्मिती कंपनीचा टर्नओव्हर 2.5 ते 3 कोटींपर्यंत वृद्धिगत करायचा असल्याचे त्या सांगतात.

error: Content is protected !!