Cow Breeds in India: विदर्भाचे भूषण गवळाऊ गाय; जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: देशात वेगवेगळ्या प्रजातीच्या गायी (Cow Breeds in India) आहेत. वेगवेगळ्या प्रदेशात आढळणाऱ्या गायी तेथील वातावरणास अनुकूल असतात. अशीच विदर्भाचे भूषण म्हणून गौरवली जाणारी गवळाऊ (Gaolao Cow) किंवा गौळाऊ गाय विदर्भात प्रसिद्ध आहे. जाणून घेऊ या गायीचे वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये (Cow Breeds in India)

महाराष्ट्रातील विदर्भ व मध्यप्रदेशातील काही भागात ही गाय आढळते. गौळाऊ गोवंश विदर्भाच्या उष्ण हवामानातही शेतीकाम, दूध उत्पादनात सातत्य राखणारा आहे. या गायींची रोगप्रतिकारशक्ती चांगली असून शेतीकामासाठी बैलही उत्तम असतात. गवळाऊ गायी (Gaolao Cow) कृष्णाच्या काळातील असल्याचे सांगितले जाते.

शरीर वैशिष्ट्ये

ही गाय मध्यम उंचीची, हलक्या बांध्याची, रुंद व लांबट शरीराची असते. डोके अरुंद व खाली निमुळते असते. कपाळ सपाट, डोळे बदामी आकाराचे व उंच असतात. शिंगे आखूड असून काहीशी मागे वळलेली असतात. मान आखूड व खांदा एका बाजूला थोडा झुकलेला असतो.पाय सरळ व मजबूत, पोळ खूपच लोंबती आणि स्तन मध्यम आकाराचे असते. अंगावरील कातडी सैल असते. शेपटी आखूड व रंग पांढरा असतो. बैल चपळ असून शेती व वाहतुकीकरिता उत्तम असतात.                                                                                 

गायीचे सरासरी वजन 330 किलो असते तर बैलाचे वजन 450 किलोपर्यंत असते. या गायीचे प्रथम माजावर येण्याचे वय 48 महिने असते.

उत्पादन क्षमता (Milk Production)

ही गाय (Cow Breeds in India) एका दिवसात सरासरी 5 ते 6 लिटर दूध उत्पादन. दूध देण्याच्या कालावधी  210 – 240 दिवसांचा असून सरासरी दुधाचे उत्पादन 470 ते 725 लिटर असते.

error: Content is protected !!