Garlic Price Rise: शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी; लसूण दरात मोठी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या लसूण दरात मोठ्या प्रमाणात वाढ (Garlic Price Rise) होत असून 150 ते 200 रुपये प्रतिकिलो दराने मिळणार लसूण सध्या मंडईत 400 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जात आहे. उत्तर प्रदेशात (UP) लसणाच्या किंमतीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यावेळी लसणाचे भाव गगनाला भिडल्याने (Garlic Price Rise) लोकांच्या आहारात लसणाचा कमी वापर होतांना दिसत असला तरी शेतकरी राजा मात्र या दर वाढीने सुखावला आहे.

गेल्या वर्षी लसणाचे उत्पादन अधिक झाले होते. लसणाचा प्रदेश समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशात त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने गेल्या वेळी लसणाची 25 रुपये किलोने विक्री झाली होती. यावेळी शेतकऱ्यांनी लसणाची पेरणी कमी केल्याने कमी उत्पादनामुळे पुरवठा होत नसल्याने भाव वाढले आहेत. मागणी वाढली आहे. अशात त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळं लसणाच्या दरात वाढ (Garlic Price Rise) होताना दिसत आहे. याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे लसूण आहे, त्यांना होत आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचं चित्र दिसत आहे. 

उत्पादन कमी झाल्याने भाव वाढले (Low production Increases Rates)

गेल्या वेळी लसणाच्या भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळं यावेळी शेतकऱ्यांनी नफ्यासाठी कमी लसणाची पेरणी केली होती. साहजिकच त्यामुळं त्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळेच सध्या बाजारात उपलब्ध असलेला लसूण 150 ते 200 रुपये किलो दराने (Garlic Price Rise) मोठ्या प्रमाणात विकला जात आहे. दरम्यान, लसणाचे नवे पीक केव्हा येईल, त्याचे उत्पादन जास्त झाल्यास भाव कमी होण्याची अपेक्षा आहे.

शेतकर्‍यांनी या गोष्टीचा अभ्यास करून त्यानुसार एखाद्या वस्तूच्या मागणीनुसार उत्पादन करावे. एकच पीक घेण्याऐवजी वेगवेगळी पिके थोड्या थोड्या प्रमाणात घेतल्यास कृषी मालाची मागणी वाढून दरही चांगला मिळेल.  उलट एकाच पीक घेतल्यास उत्पादन जास्त होऊन बाजारभाव तर मिळतच नाही शिवाय साठवणुकीत सुद्धा अडचण येते.

हे सुद्धा वाचा: सेंद्रिय पद्धतीने लसणाची लागवड करा, 3 लाखांपर्यंत होईल कमाई; सर्वोत्तम वाण कोणते? अन खत नियोजन जाणून घ्या

भारतामध्ये लसणाच्या निर्यातीत वाढ (Increase in Garlic Export)

जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करत नाही. पण भारत आता या आघाडीवरही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सातत्याने वाढत आहे. ज्यामुळं चीनच्या अडचणी वाढत आहेत. दरम्यान, चीनने ब्लीच केलेला लसूणही टाकण्यास सुरुवात केली आहे.सध्या लसणाच्या निर्यातीत चीन अजूनही जगात आघाडीवर आहे यात शंका नाही. एकेकाळी चीनने जगातील 80 टक्के लसणाची निर्यात केली होती. जी आता अलिकडच्या वर्षांत 70 ते 75 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. दरम्यान, भारताच्या लसूण निर्यातीत वाढ झाली आहे.

error: Content is protected !!