Garlic Rate : लसणाला 40,000 रुपये क्विंटल भाव; शेतकरी करतायेत बंदूक घेऊन राखणदारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात कांदा, सोयाबीन, कापूस या पिकांच्या दर (Garlic Rate) घसरणीमुळे शेतीत चिंतेत आहे. त्यांना आपल्या पिकाचा उत्पादन खर्च देखील मिळत नाहीये. अशातच आता मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना मात्र लसूण पिकाला प्रति किलोला 400 ते 500 रुपये दर मिळून, कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सध्या लसणाच्या वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधून लसूण चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. परिणामी, या शेतकऱ्यांनी आता चोरीच्या भीतीने बंदूक घेऊन, वावरात लसूण (Garlic Rate) पिकाची राखणदारी करणे सुरु केले आहे.

कुत्र्यांसह बंदुकीची मदत (Garlic Rate Farmer Carry Gun)

मागील आठवड्यात मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला 13 एकरात लसूण पिकातून, 1 कोटीहून अधिक कमाई झाल्याचे समोर आले होते. या शेतकऱ्याने आपला लसूण चोरी होऊ नये. म्हणून चक्क वावरातच 8 हजार रुपये खर्च करून सीसीटीवी कॅमेरे बसविले होते. त्यानंतर आता मध्यप्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात देखील शेतकरी आपल्या लसूण पिकाची बंदूक घेऊन राखणदारी करत असल्याचे समोर आले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांनी चोरीसह खुनाचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी कुत्र्यांच्या मदतीने शेतात लसूण पिकाची राखणदारी केली जात आहे. दरवाढीमुळे मध्यप्रदेशातील शेतकरी लसूण पिकातून मालामाल झालेले पाहायला मिळत आहे.

अधिक भावासाठी वाळवण्याचा निर्णय

उज्जैन जिल्ह्यातील मंगरोला गावचे शेतकरी जीवन यांनी एका आघाडीच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “त्यांना आपल्या एक एकर जमिनीमध्ये जवळपास 50 क्विंटल लसूण उत्पादन मिळाले आहे. मात्र सध्या लसूण ओला असल्याने, तो कमीत-कमी 15 दिवस शेतातच वाळवावा लागणार आहे. आजुबाजुच्या गावांसह अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण चोरीच्या घटना समोर येत आहेत. ज्यामुळे आपण शेतात दोन सीसीटीवी कॅमेरे बसविले असून, बंदुकीचा देखील आधार घेतला आहे. याशिवाय आपण नेहमी दोन पाळीव कुत्रे सोबत ठेवतो. ओला लसूण 15 हजार रुपये क्विंटल तर सुकलेला लसूण 40 हजार रुपये क्विंटल विकला जात आहे. त्यामुळे अधिक भाव (Garlic Rate) मिळण्यासाठी आपण सुकवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नेहमीपेक्षा चारपट अधिक भाव

तर अन्य एका शेतकऱ्याने म्हटले आहे की, उज्जैन, बडनगर, घट्टिया, नागदा आणि खाचरोद परिसरात मोठया प्रमाणात लसूण लागवड केली जाते. ज्यामुळे आपल्याकडील या भागांमध्ये सध्या लसूण काही प्रमाणात काढणीनंतर ओला असल्याने शेतकरी शेतामध्ये अधिक दर मिळण्यासाठी सुखवत आहे. मात्र याचाच फायदा घेऊन चोरीच्या अनेक घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पाळीव कुत्रे, सीसीटीवी आणि बंदूक घेऊन लसूण पिकाची राखणदारी करावी लागत आहे. यावर्षी लसूण पिकाला नेहमीपेक्षा चारपट अधिक भाव (Garlic Rate) मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!