Gat Sheti Yojana: महाराष्ट्र शासनाची ‘गट शेती योजना’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: गट शेतीस (Gat Sheti Yojana) प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकर्‍यांच्या गट शेतीस चालना देणे ही योजना राज्यात राबवण्यास शासनाने सन २०१८-१९ मध्ये मान्यता दिली आहे. सदर योजने अंतर्गत प्रतिवर्षी २०० शेतकरी गट स्थापना करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. या दोनशे गटांची जिल्हानिहाय विभागणी तसेच या योजने (Gat Sheti Yojana) अंतर्गत गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी सहकार्य भावना निर्मित‍ करणे हे गट शेतीचे उद्दिष्ट आहे.

गट शेतीची उद्दिष्ट (Gat Sheti Yojana Objective)

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कृषी निविष्ठा प्रशिक्षण, सिंचन यांत्रिकीकरण, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, कृषिमाल प्रक्रिया व पणन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरीव वाढ होण्यासाठी सामुहिक शेती करण्याच्या आधुनिक पद्धती व काटेकोर नियोजनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने शेतकरी गटांमार्फत उत्पादक कंपनीमार्फत गट शेतीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. हे या गटशेतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच

कशासाठी गट शेतीची आवश्यकता असणार आहे? (Gat Sheti Yojana)

खालील वेगवेगळ्या कारणांसाठी गट किंवा समूह शेतीची आवश्यकता आहे.

  • जमिनीचे सातत्याने होत असलेले विभाजन किंवा तुकडे
  • उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर करणे.
  • विपणन पद्धतीचा अवलंब
  • काढणीपश्‍चात प्रक्रिया करणे
  • प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन
  • शेती पूरक जोडधंदा

गट शेतीसाठी आवश्यक पात्रता (Eligibility for Gat Sheti Yojana)

  • गटामध्ये किमान खातेदार शेतकरी संख्या 20 व समूहाचे किमान क्षेत्र 100 एकर असावे.
  • कोकण विभागाकरिता क्षेत्र मर्यादा 100 एकर ऐवजी 50 एकर व क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक अनुदान अनुज्ञेय राहील.
  • अल्पभूधारक शेतीच्या संसाधनाची व मनुष्यबळाची उणीव असणाऱ्या क्षेत्रातील शेतकऱ्यांचा गट किंवा समूह शेती.
  • समान पीक पद्धतीवर आधारित उत्पादन प्रक्रिया ते विक्री यामधील समान उद्दिष्टवर काम करणाऱ्या शेतकऱ्यासाठी गट किंवा समूह शेती
  • विपणन आधारित समूह शेती संकल्पना
  • प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन या संकल्पनेवर आधारित समूह शेती संकल्पना
  • पीक उत्पादन प्रक्रिया मधील विशिष्ट कामावर आधारित समूह शेती संकल्पना
  • समान आर्थिक व भौगोलिक परिस्थितीत समान व पूरक व्यवसाय करणारे शेतकरी

गट शेतीस अनुदान मर्यादा (Gat Sheti Yojana Subsidy)

  • अवजारे बँक या घटकासाठी प्रचलित योजनेतून 40 टक्के अनुदान देणे आहे. त्यासाठी 40 टक्के अनुदान प्रचलित योजनेतून प्राप्त होणार असेल, तर 20 टक्के अनुदान गटशेतीतून देय राहील.
  • सामूहिक शेततळे या घटकासाठी 1 कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून 100% एवढे अनुदान देय आहे. गट शेती योजनेतून 60 टक्के अनुदान देता येईल.
  • सामूहिक अवजारे किंवा यंत्र बँक निर्मिती या घटकांसाठी अनुदान 60 टक्के पर्यंत सामूहिक अवजारे बँकेला किंवा अवजारांना देय असणार आहे.
  • सामुदायिक पशुधन व्यवस्थापन अंतर्गत गोठा बांधकाम, स्वर युनिट करणे, कंपोस्ट निर्मितीसाठी मुरघास युनिट व आवश्यक संयंत्र, अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी जाळ्या तसेच दूध संकलन व प्रक्रियेसाठी आवश्यक संयंत्र या घटकासाठी 60 टक्के अनुदान गटशेती योजनेतून देय राहील.
  • सामुहिक तत्वावर पॉलिहाऊस शेडनेट हाऊस उभारणी करण्यासाठी गट शेती अंतर्गत अतिरिक्त 60 टक्के पर्यंत अनुदान घेता येईल.
  • सामुदायिक संचालन साठवणूक व प्रक्रिया केंद्राची निर्मिती तसेच विपणन व्यवस्था या बाबींना प्रगत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना यामधून प्राधान्याने अनुदान उपलब्ध करून घ्यावे तसेच अतिरिक्त 60 टक्के पर्यंत अनुदान गटशेती योजनेतून घेता येईल. अनुदानाच्या किमान 20 टक्के खर्च करणे बंधनकारक राहील.

गट शेती योजनेची अंमलबजावणी (Implementation of Gat Sheti Yojana)

  • आत्मा संस्थेकडे नोंदणी
  • सहकारी संस्था अधिनियम अन 1960 अंतर्गत नोंदणी, शेतकरी उत्पादक कंपनी अधिनियमन 1956 अंतर्गत नोंदणी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
  • दोन वर्षांत या योजनेअंतर्गत प्रत्येक गटास जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • प्रतिवर्षी 200 शेतकरी गटांना त्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
  • पीक पद्धती व शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन गटशेती साठी आदर्श नमुना प्रकल्प मॉडेल तयार करण्यात येईल.
  • यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या आदर्श नमुना प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल.
  • या योजनेत शेती अवजारे, बँकेचा समावेश ही करण्यात आला आहे.
  • गटातील सदस्यांची संख्या वाढण्यासह या सदस्यांचे एकूण क्षेत्र 100 एकरांच्या पटीत वाढले तर वाढीव असलेल्या प्रत्येकी 100 एकरांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे वाढीव अनुदान देय राहणार आहे.
  • या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व पुरस्कारास पात्र ठरलेल्या शेतकरी गटांना प्रथम (25 लाख), द्वितीय (15 लाख), तृतीय (5 लाख) याप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता शेतकरी गटांच्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न सलग्न असणे अनिवार्य असणार आहे.

error: Content is protected !!