Gawar Bajar Bhav : अहमदनगरमध्ये गवारीला 15,000 रुपये क्विंटल भाव; पहा राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गवारीचे दर (Gawar Bajar Bhav) टिकून आहेत. संक्रांतीच्या वेळी गवारीचे दर सर्वोच्च पातळीवर पोहचले होते. त्यानंतर मात्र, चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दरात काहीशी घसरण नोंदवली गेली होती. तेच दर सध्याच्या घडीला टिकून आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या गवारीला कमाल 6000 ते 10000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत आहे. याउलट अहमदनगर बाजार समितीमध्ये मात्र गवारीचे दर कडाडले असून, त्या ठिकाणी गवारीचा कमाल दर (Gawar Bajar Bhav) प्रति क्विंटल 15,000 रुपयेपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता वांगी व शिमला मिरचीच्या दराने जरी शेतकऱ्यांना मारले असले तरी गवारीने तारले असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

कुठे मिळतोय सर्वाधिक दर? (Gawar Bajar Bhav In Maharashtra)

अहमदनगर बाजार समितीत (Gawar Bajar Bhav) कमाल 15000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल, जुन्नर (ओतूर) बाजार समितीत कमाल 12300 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल, चांदवड (नाशिक) बाजार समितीत कमाल 11000 ते किमान 10000 रुपये तर सरासरी 10600 रुपये प्रति क्विंटल, पुणे (मोशी) बाजार समितीत कमाल 10000 ते किमान 6000 रुपये तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, पुणे-मांजरी बाजार समितीत कमाल 10000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 8500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

जुन्नर (नारायणगाव) बाजार समितीत कमाल 10000 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत कमाल 9700 ते किमान 3500 रुपये तर सरासरी 6600 रुपये प्रति क्विंटल, नाशिक बाजार समितीत कमाल 9000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत कमाल 9000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

6 ते 8 हजारांदरम्यान दर कुठे?

मंचर (पुणे) बाजार समितीत कमाल 8810 ते किमान 6300 रुपये तर सरासरी 7555 रुपये प्रति क्विंटल, पुणे बाजार समितीत कमाल 8000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 6000 रुपये प्रति क्विंटल, सातारा बाजार समितीत कमाल 8000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत कमाल 6000 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत कमाल 6000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 5500 रुपये प्रति क्विंटल, खेड-चाकण बाजार समितीत कमाल 6000 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत कमाल 8000 ते किमान 7000 रुपये तर सरासरी 7500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!