Gawar Bajar Bhav : संक्रांतीमुळे गवारीच्या दरात मोठी वाढ; वांग्याच्या दरावर संक्रांत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मकर संक्रांतीचा सण अवघा दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गवारीच्या दराने (Gawar Bajar Bhav) मोठी उसळी घेतली आहे. आज राज्यातील छत्रपती संभाजीनगर, राहता, अकलुज (सोलापूर) या बाजार समित्यांमध्ये गवारीच्या दरात प्रति क्विंटलमागे जवळपास 1500 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. तर संक्रांतीच्या सणाला वांग्यालाही मोठी मागणी असते. मात्र यावर्षी मकर संक्रांतीला वांग्याच्या दरावर संक्रांत आल्याचे पाहायला मिळत असून, वांग्याचे दर मागील महिन्याच्या तुलनेत जवळपास निम्म्याने घसरले (Gawar Bajar Bhav) आहेत.

आजचे राज्यातील गवारीचे दर (Gawar Bajar Bhav Today 13 Jan 2024)

छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज गवारीची (Gawar Bajar Bhav) 3 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 9000 तर सरासरी 9500 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीत आज गवारीची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 11000 ते किमान 11000 तर सरासरी 11000 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज बाजार समितीत आज गवारीची 14 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12000 ते किमान 6000 तर सरासरी 10000 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बाजार समितीत आज गवारीची 5 क्विंटल आवक झाली असून, कमाल 9000 ते किमान 6000 तर सरासरी 8000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आजचे राज्यातील वांग्याचे दर

सोलापूर बाजार समितीत आज वांग्याची 34 क्विंटल आवक झाली असून, कमाल 6500 ते किमान 2500 तर सरासरी 3500 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर जिल्ह्यातील अकलुज बाजार समितीत आज वांग्याची 18 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4500 ते किमान 2500 तर सरासरी 4000 रुपये प्रति क्विंटल, मंगळवेढा बाजार समितीत आज वांग्याची 36 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 800 तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल, कोल्हापूर बाजार समितीत आज वांग्याची 271 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 1000 तर सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटल, पुणे-पिंपरी बाजार समितीत आज वांग्याची 7 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7000 ते किमान 6000 तर सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत आज वांग्याची 6 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7800 ते किमान 3000 तर सरासरी 5400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे भाजीपाल्याचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व भाजीपाला पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. आज राज्यातील राहता आणि पुणे-पिंपरी बाजार समिती वगळता कोणत्याही बाजार समितीत वांग्याला कमाल 7000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या वरती दर मिळालेला नाही. गवारीच्या दराने मात्र अनेक बाजार समित्यांमध्ये मोठी उसळी घेतली आहे. बाजारात गवारीची आवक कमी आणि मागणी वाढल्याने दरात ही वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!