Gawar Bajar Bhav : गवारीच्या दरात तेजी, शिमला मिरचीने तळ गाठला; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून गवारीच्या दरातील (Gawar Bajar Bhav) तेजी कायम आहे. नाशिक, राहता, अहमदनगर आणि संभाजीनगर या बाजार समित्यांमध्ये सध्या गवारीला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांच्या वरती दर मिळतो आहे. याउलट वांग्याप्रमाणेच शिमला मिरचीच्या दराने मात्र तळ गाठला आहे. राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीला सध्या प्रति क्विंटल कमाल 3000 ते 4000 हजार रुपयांच्या आसपास दर (Gawar Bajar Bhav) मिळत आहे. परिणामी शिमला मिरची उत्पादकांना पिकासाठी केलेला खर्च मिळणेही मुश्किल झाले आहे.

गवारीला सर्वाधिक दर कुठे? (Gawar Bajar Bhav Today 23 Jan 2024)

नाशिक बाजार समितीत आज गवारीची 2 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12000 ते किमान 7000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, अहमदनगर बाजार समितीत आज गवारीची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12000 ते किमान 6000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल, राहता बाजार समितीत आज गवारीची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 12000ते किमान 12000 तर सरासरी 12000 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज गवारीची 1 क्विंटल आवक झाली असून, कमाल 10000 ते किमान 8000 तर सरासरी 9000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. या बाजार समित्यांमध्ये तुलनेने आवक कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये गवारीचे दर आज कमाल 6000 ते 8000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावलेले होते.

शिमला मिरचीच्या दरात निम्म्याने घट

दरम्यान, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीची अल्प आवक असूनही, सर्वच बाजार समित्यांमध्ये कमाल दर 3000 ते 4000 हजार रुपये क्विंटलच्या आसपास पाहायला मिळाले. चालू जानेवारी महिन्याचा सुरुवातीला राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये शिमला मिरचीला कमाल 7000 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत होता. मात्र त्यात पंधरा दिवसांमध्ये जवळपास निम्म्याने घट नोंदवली गेली आहे. शिमला मिरचीवरील थ्रिप्स या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना वारंवार फवारण्या घ्यावा लागतात. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या बाजार समित्यांमध्ये दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

error: Content is protected !!