Gilke Lagwad : ‘या’ आहे गिलक्याच्या पाच सर्वोत्तम प्रजाती; उन्हाळ्यात मिळते भरघोस उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात भाजीपाला लागवड (Gilke Lagwad) करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, ते नियमित आलटून-पालटून भाजीपाला पिके घेत असतात. यात शेतकरी अनेक वेलवर्गीय फळभाज्यांची देखील लागवड करतात. यात गिलके (घोसाळे) लागवड ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रभावी मानली जाते. लागवडीनंतर साधारणपणे 50 ते 55 दिवसांमध्ये फळ तोडणीला येते. त्यामुळे आत्ता लागवड केल्यास ऐन मे महिन्यात भर उन्हाळ्यात तुमचे पीक काढणीला येईल. ज्यातून उन्हाळ्यात मे आणि जून महिन्यात भाजीपाल्याचे गगनाला भिडलेले असतात. त्यामुळे उन्हाळी गिलके लागवडीतून (Gilke Lagwad) तुम्हांला मोठी आर्थिक कमाई होऊ शकते.

बाजारात नेहमीच असते मागणी (Gilke Lagwad In Maharashtra)

गिलके लागवड ही प्रामुख्याने रोपे आणि टोकन अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. त्यामुळे तुमच्याकडे काही प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यास, तुम्ही ठिबक पद्धतीने गिलक्याचे पीक घेऊ शकतात. गिलक्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे त्याला बाजारात नेहमीच मोठी मागणी असते. शेतकरी उन्हाळी गिलके लागवड (Gilke Lagwad) सुविधा उपलब्ध असल्यास, पॉलीहाऊसमध्ये प्रभावीपणे घेऊ शकतात. उन्हाळी गिलके लागवडीसाठी 15 फेब्रुवारी ते मार्चचा पहिला आठवडा हा उत्तम काळ मानला जातो.

या आहेत प्रमुख पाच प्रजाती

1. महिको (पल्लवी) वाण

महिको (पल्लवी) हे उन्हाळयाच्या हंगामामध्ये अधिक उत्पादन देण्यास सर्वोत्तम वाण मानले गेले आहे. या जातीचा रंग हिरवा असतो. या वाणाच्या एका गिलक्याचे वजन हे 150 ते 200 ग्रॅम इतके असते. विशेष म्हणजे हे वाण 40 ते 45 दिवसांमध्ये खूपच कमी कालावधीमध्ये तोडणीला येते.

2. नामधारी एनएस 474 वाण

नामधारी एनएस 474 या वाणाचा रंग गडद हिरवा असतो. याची लांबी ही साधारणपणे 40 ते 45 सेमी इतकी असते. या वाणाच्या एका गिलक्याचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. या वाणाची देखील पहिली तोडणी 40 ते 45 दिवसांत सुरु होते.

3. व्हीएनआर (आरती)

व्हीएनआर (आरती) या गिलक्याच्या वाणाचा रंग हा अधिक हिरवा असतो. याची लांबी ही जवळपास 25 ते 30 सेमी इतकी असते. तर याचे वजन हे 200 ते 225 ग्रॅम इतके असते. या वाणाची पहिली तोडणी 50 ते 55 दिवसांमध्ये सुरु होते.

4. इरीस मॅक्स 001

इरीस मॅक्स 001 हे गिलक्याचे सर्वोत्तम वाण मानले जाते. त्याची लांबी ही 30 ते 35 सेमी इतकी असते. तर एका गिलक्याचे वजन हे साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम इतके असते. हे वाण कमीत कमी 45 ते 50 दिवसांमध्ये तोडणीला येते.

5. नुनहेम्स युएस 6001

गिलक्याचे अधिक उत्पादन देणारे वाण म्हणून नुनहेम्स युएस 6001 हे वाण विशेष प्रसिद्ध आहे. याची लांबी ही 45 ते 50 सेमी इतकी असते. तर एका गिलक्याचे वजन हे 160 ग्रॅम ते 210 ग्रॅम इतके असते. याशिवाय हे वाण 55 ते 60 दिवसांमध्ये तोडणीला येते.

error: Content is protected !!