Farmer Success Story: दोन एकरांत विक्रमी 45 टन आले उत्पादनातून तब्बल 47 लाखांचा नफा कमविणारा शेतकरी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या शेतकर्‍यांचा नगदी पिके (Farmer Success Story) घेण्याकडे कल आहे. असेच एक पीक म्हणजे आले (Ginger Crop) ज्याला आपण अद्रक सुद्धा म्हणतो. भारतीय खाद्यात वेगवेगळ्या प्रकारे वर्षभर वापरल्या जाणारे आले पिकाला दर सुद्धा चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी कमी कालावधीत सुद्धा चांगला नफा मिळवू शकतात. अशाच एका आले उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा (Farmer Success Story) आज आपण जाणून घेणार आहोत.

हा शेतकरी म्हणजे सांगली (Sangali) जिल्ह्यातील शिराळा येथील उत्तम देशमुख (Farmer Success Story.

या युवकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि कसल्याही मजूरांची वा कामगारांची मदत न घेता दोन एकर क्षेत्रात अवघ्या दहा महिन्यात आल्याचे 45 टन एवढे विक्रमी उत्पादन (Record production) घेऊन सर्व शेतकर्‍यांसमोर एक आदर्श (Farmer Success Story निर्माण केला आहे.

उत्तम देशमुख यांनी मे 2023 मध्ये ऊस तोडणी झाल्यावर आले पिकाची लागवड (Ginger Cultivation) केली. आले शेतात त्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापन केले.  

उत्तम देशमुख यांच्या शेतातील आले पिकाचे व्यवस्थापन (Farmer Success Story

  • दोन एकर मध्ये उभी आडवी नांगरट करत त्यामध्ये 25 ट्रॉली शेणखत, 4 ट्रॉली राख, 10 टन कंपोस्ट खत टाकले.
  • साडेचार फुटी बेड सोडून 9 इंचावर 50 ते 60 ग्रॅम वजनाच्या आल्याची लागण केली.
  • 40 दिवसानंतर पिकाला रासायनिक व सेंद्रिय खताचा डोस दिला. कीटकनाशके व बुरशीनाशकांची पंपा द्वारे फवारणी केली गेली.
  • फुटव्यांची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी वेळोवेळी 19:19, 12:61 असे खताचे डोस दिले.
  • 45 व्या दिवशी पहिली कीटकनाशके व बुरशीनाशकांची (Crop Protection) फवारणी केली. यानंतर प्रत्येक दहा दिवसांच्या अंतराने फवारणी केली.
  • कंद कुजू (Rhizome Rot) नये म्हणून 15 दिवसाच्या अंतराने पिकाला ठिबक सिंचनाने (Drip Irrigation) बुरशीनाशके व कीटकनाशके दिली.
  • पाण्याचा उत्तम निचरा होण्यासाठी शेताच्या कडेला चरी मारून पाणी निचर्‍याची व्यवस्था केली. करपा पडू नये व कंद कुजू नये यासाठी ही विशेष काळजी घेतली आहे.

उत्तम देशमुख यांनी सांगितले की, ते गेली तीन वर्षे 20 – 20 गुंठ्यात ते आले पिकाची लागवड करत होते. सुरुवातीला दोन वर्षे त्यांनी 20-30 रुपये किलोने आले विकले मात्र गतवर्षी 20 गुंठ्यात 11.50 टन आल्याचे उत्पादन निघाले व ते 80 रुपये किलो प्रमाणे विकले गेले. हे पैसे यावर्षी त्यांनी दोन एकरात आले लागवड करण्यासाठी वापरले. ते स्वत: फवारणी, देखभाल आदी करत होते. या कामात त्यांनी एकाही कामगाराची मदत घेतली नाही हे विशेष.

सध्या आल्याचा दर (Ginger Rate) 90 रुपये आहे मात्र बियाण्यासाठी म्हणून रहिमतपूर येथील शेतकरी त्यांच्याकडून 105 रुपये किलो दराने स्वतः आले खरेदी करत आहेत. हे खरेदीदार शेतकरी स्वतः आले काढून पॅकिंग करून शेताच्या बांध्यावरून नेत आहेत. उत्तम यांच्या शेतात एका रोपाला तीन ते साडेतीन किलो आले उत्पादन मिळाले आहे.

क्षेत्र बदलून लागवड.. 

मागील काही वर्ष आल्याला दर नव्हता, मात्र या दोन वर्षात चांगला दर मिळाला आहे. रहिमतपूर येथील शेतकरी हे गेल्या चार वर्षांपासून उत्तम देशमुख यांचेकडून बियाण्यासाठी आले खरेदी करत आहेत. पुढील वर्षी अडीच एकरात आल्याची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले, यासाठी 3 टन आले बाजूला ठेवून बाकीची विक्री केली आहे.

आले पिकाची लागवड एका क्षेत्रामध्ये चार वर्षातून एकदाच घेता येते त्यामुळे क्षेत्र बदलून त्यांना आल्याची लागवड  करावी लागते. कुटुंबियांकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे आपण यशस्वी (Farmer Success Story) झालो असल्याचे प्रगतशील शेतकरी उत्तम देशमुख यांनी दिले.

error: Content is protected !!