GM Maize : देशात जीएम मका लागवडीला परवानगी द्यावी; पोल्ट्री उद्योगाची केंद्राकडे मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला सध्या मकाची (GM Maize) काहीशी कमतरता जाणवत असून, देशभरात मकाचे दर चढेच आहे. अशातच गेल्या वर्षभरात मकाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर वाढला आहे. ज्यामुळे पोल्ट्री खाद्य निर्मिती उद्योगाला मका टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, येत्या काळात मका पिकाचे महत्व वाढणार आहे. मका टंचाई दूर करण्यासाठी काही देशांनी जीएम मका, जीएम सोयाबीन शेतीला परवानगी दिली आहे. अलीकडेच चीनने देखील जीएम मका लागवडीला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात देखील जीएम मका (GM Maize) लागवडीला परवानगी देण्यात यावी. अशी मागणी पोल्ट्री उद्योगाकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

आयात शुल्कात कपात करावी (GM Maize Cultivation)

पोल्ट्री फेडरेशन या देशातील आघाडीच्या संघटनेसह कंपाउंड लाइव स्टॉक फीड मैन्युफैक्चर्स एसोसिएशन आणि पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी केंद्र सरकारकडे जीएम मका (GM Maize) लागवडीला देशात परवानगी देण्याची मागणी केली आहे. याशिवाय सध्याच्या घडीला जाणवणारी मका टंचाई कमी करण्यासाठी मका आयातीवरील शुल्क 15 टक्क्यांनी कमी करण्यात यावे, असेही या संस्थांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे मका आयातीबाबत या संघटनांनी या आधीही केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. तर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संघटनेने देखील जीएम मका लागवडीला परवानगी देण्याची मागणी आधी केलेली आहे.

केंद्र सरकारकडून कानाडोळा

दरम्यान, भारतामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जीएम मका उत्पादनाला परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय मका आयात शुल्कात कपात करण्याची देखील मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, सरकारकडून या दोन्ही मागण्यांकडे कानाडोळा केला जात आहे. विशेष म्हणजे सरकारने याकडे गांभीर्याने न पाहिल्यास येत्या काळात देशातील पोल्ट्री उद्योग धोक्यात येण्याची शकयता आहे. असेही या संघटनांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

देशात तुलनेने अल्प उत्पादन

पोल्ट्री उद्योगातील जाणकारांच्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी 34.60 दशलक्ष टन इतके मका उत्पादन होते. या उत्पादनाच्या माध्यमातून पोल्ट्री उद्योगासह देशातील अन्न सुरक्षा पूर्ण करण्यास असक्षम आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारतातून एकूण 6.65 लाख टन पोल्ट्री खाद्य निर्यात करण्यात आले होते. ज्याची एकूण किंमत 1081.62 कोटी रुपये इतकी आहे. अशातच यंदा देशातील मका इथेनॉल उद्योगाकडे वळला आहे. त्यामुळे चिंतेत आणखीनच वाढ झाली आहे.

error: Content is protected !!