हॅलो कृषी ऑनलाईन : निसर्गाचे आगळेवेगळे चमत्कार (Goat Birth Calfs) आपल्याला नेहमीच ऐकायला मिळत असतात. मात्र आता एका शेळीने गायीच्या दोन वासरांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. तुम्ही गोंधळात पडला असाल की शेळी मुळीच दिसायला वासराच्या आकाराची असते. ती गायीच्या वासरांना जन्म कसा देऊ शकते? मात्र ही संपूर्ण बातमी वाचल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग पाहूया नेमका (Goat Birth Calfs) काय आहे हा दैवी चमत्कार…
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील बिलासपूर गावात हा चमत्कार समोर आला असून, येथील एका शेळीने तीन पिलांना जन्म (Goat Birth Calfs) दिला आहे. मात्र शेळीने जन्म दिलेली दोन पिल्ले ही बकरीची नसून, ते दोन गायीची वासरू आहेत. तर तिसरे पिल्लू शेळीच्या बकरासारखे दिसणारे आहे. शेळीने गायीच्या वासरांना जन्म दिल्याने लोकांनी या संपूर्ण प्रकाराला दैवी चमत्कार असल्याचे म्हटले आहे. शेळीने जन्म दिलेली दोन्ही वासरे ही हुबेहूब चेहरा, पाय. पायाच्या खूर आणि शरीराची रचना ही पूर्णपणे गायीच्या वासरांसारखी आहे. त्यामुळे बिलासपूर गावातील लोकांनी या दोन्ही वासरांची पूजा-अर्चना करणे सुरु केले आहे.
जेनेटिकल डिसऑर्डरचा प्रकार (Goat Birth Calfs By Genetical Disorder)
पशुवैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, “एखाद्या शेळीने गायीच्या दोन वासरांना जन्म देणे, अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. मात्र कधी-कधी जेनेटिकल डिसऑर्डर (आनुवंशिक बदल) आणि गर्भातील गुंतागुंतीच्या परिस्थितीमुळे असे प्रकार समोर येत असतात. आनुवंशिक बदल आणि गर्भाचा आकार बदल्याने शेळीच्या पोटी ही दोन वासरे जन्माला आली असावी. जगाच्या पाठीवर लोकांना अचंबित करणारे असे अनेक प्रकार नेहमीच समोर येत असतात.”
निसर्गाचा चमत्कार
निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. मात्र शेळीने गायीच्या दोन वासरांना जन्म देणे हा निसर्गाचा दैवी चमत्कार आहे. अशी भावना सध्या बिहारमधील समाजमाध्यमांवर नागरिक व्यक्त करताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर याबाबतची माहिती समोर आल्यानंतर हा मुद्दा सर्वत्र चांगलाच चर्चेत असलयाचे दिसून येत आहे.