Goat Breeds : शेळीच्या ‘नायजेरियन ड्वार्फ’ प्रजातीचे संगोपन करा; मिळेल बंपर कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेळी पालन (Goat Breeds) हा एक फायदेशीर पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात शेळीपालन वाढले आहे. कमी कष्टात यामध्ये चांगले पैसे मिळवता येतात. सरकारही अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देत आहे. आता सर्वात लहान जातीची शेळी पाळण्याची प्रथा शेतकऱ्यांमध्ये वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या नायजेरियन ड्वार्फ प्रजातीबद्दल (Goat Breeds) जाणून घेणार आहोत.

कमी चाऱ्यात अधिक नफा (Goat Breeds For Farmers)

नायजेरियन ड्वार्फ प्रजातीच्या शेळ्यांना (Goat Breeds) जास्त चारा देखील लागत नाही. तसेच जास्तीचे कष्ट देखील करावे लागत नाहीत. या शेळ्या या दिसायला अगदी लहान असल्या तरी नफा देण्याच्या दृष्टीने इतर जातीच्या शेळ्यांपेक्षा खूपच चांगले आहे. या शेळ्यांसाठी तुम्ही बांधलेले शेड अतिशय स्वच्छ असावे. वेंटिलेशन प्रणाली आणि सांडपाण्याचा प्रवाह चांगला असावा. शेळ्यांना पुरेशा प्रमाणात पोषक आहार देण्याचा प्रयत्न करा.

किती पिल्लांना जन्म देते?

नायजेरियन ड्वार्फ या शेळ्यांना हिरव्या भाज्या खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे. पाण्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे. या शेळ्यांचा प्रजनन दर इतरांपेक्षा जास्त असतो. ते वर्षभर प्रजनन करू शकतात. एक शेळी सरासरी 2 ते 4 पिलांना जन्म देते. ते साधारण ६ ते ७ महिन्यांत परिपक्व होतात आणि दूध देऊ लागतात. यामुळे इतर जातींपेक्षा ही जात फायदेशीर ठरते. या शेळ्या खूप मजबूत आणि कठोर प्राणी आहेत आणि त्यांची सहसा थोडी काळजी घ्यावी लागते.

दूध उत्पादनासाठी सर्वोत्तम शेळीची जात

शेतकऱ्यांना कमी खर्चात या शेळ्यांचे संगोपन करून चांगला नफा मिळू शकतो. ही शेळी ही मांस आणि दूध उत्पादनासाठी शेळीची सर्वोत्तम जात मानली जाते. दिवसभरात इतर जातीच्या शेळ्यांना जेवढा चार लागतो. त्यापेक्षा कमी चारा या शेळ्यांना लागतो. यामुळे अगदी कमी खर्चात कष्टात कमी गुंतवणूक करून तुम्ही तुम्ही चांगले पैसे कमवू शकतात. इतर शेळ्यांच्या शरीराच्या आकाराच्या तुलनेत जास्त दूध उत्पादक आहेत. याशिवाय त्याचे मांसही बाजारात चांगल्या दराने विकले जाते. सध्या बाजारात मांसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे यामध्ये शेतऱ्यांना कधी तोटा देखील सहन करावा लागणार नाही.

error: Content is protected !!