Goat Farming : बरबरी प्रजातीच्या बोकडाची सर्वत्र चर्चा; केंद्रीय शेळी संशोधन संस्थेकडून सन्मान!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोणताही व्यवसाय (Goat Farming) करताना त्या व्यवसायातील बारकावे माहिती असतील तर त्यातून अधिकाधिक नफा मिळवण्यास मदत होते. राज्यात बरेच शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. मात्र, काही शेतकऱ्यांकडे शेळी केवळ एका पिल्लाला जन्म देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. तेच शेतकऱ्यांना नियमित अधिक पिल्ले देणाऱ्या प्रजातीबद्दल माहिती असेल तर शेतकरी शेळीपालनातून मोठ्या प्रमाणात नफा कमावू शकतात. याच पार्श्वभूमीवर सध्या बरबरी या प्रजातीच्या एका बोकडाची (Goat Farming) सर्वत्र चर्चा सुरु आहे. या बोकडाला युपीच्या मथुरा येथील केंद्रीय बकरी संशोधन संस्था (सीआयआरजी) कडून सन्मानित करण्यात आले आहे.

सीआयआरजीकडून पुरस्काराने सन्मानित (Goat Farming Barbari Goat Breeding)

शेळीपालन (Goat Farming ) करताना शेळीच्या दरवेळी एक पिल्लू देण्याबाबत शेतकरी त्रस्त असतात. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत असते. मात्र सध्या मथुरा येथील केंद्रीय बकरी संशोधन संस्थेने एका बरबरी प्रजातीचा बोकडाला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या बोकड्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळी शेळीला तीन पिल्ले मिळत असल्याने, बरबरी प्रजातीच्या या बोकडाला केंद्रीय बकरी संशोधन संस्थेकडून सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामुळे सध्या या बोकडाची सर्वत्र चर्चा होत असून, शेळीपालनादरम्यान नेहमी एकच बकरू मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी मनाली जात आहे.

केवळ ब्रीडिंगसाठी वापर

या बोकडाचे मालक रशीद यांनी म्हटले आहे की, आपण बाजारातून बरबरी प्रजातीचा लहान बोकड खरेदी केला होता. मध्य प्रदेशातील एका पशुपालकाकडून (Goat Farming) हा बोकड आपण विकत घेतला होता. त्यावेळी त्या विक्रेत्याने आपल्याला या बोकडाच्या प्रजातीच्या महतीबद्दल सांगितले होते. त्यानुसार आपण या बोडकाचे व्यवस्थित पालन पोषण करत असून, त्याला आपण केवळ ब्रीडिंगसाठी वापरता आहोत. विकत घेतल्यापासून आतापर्यंत आपण त्याला 50 हुन अधिक वेळा ब्रीडिंगसाठी वापरले आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

दिला जातो नियमित खुराक

रशीद सांगतात, आपण आपल्या बोकडाला नियमित 400 ग्रॅम मिक्चर, 1.25 किलो हिरवा चारा, 1.25 किलो सुका चारा देतो. याशिवाय दररोज डाळींचा चूर त्याला दिला जातो. याशिवाय त्याला ब्रीडिंगसाठी वापरायचे असेल तेव्हा काही दिवस अगोदर त्याच्या आहारात वाढ केली जाते. ज्यामुळे तो एकाच वेळी तीन पिल्ले देण्यास सक्षम ठरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘शहरी शेळी’ म्हणून ओळख

केंद्रीय बकरी संशोधन संस्थेचे (सीआयआरजी) बरबरी बकरी तज्ज्ञ एम.के.सिंग यांनी म्हटले आहे की, “बरबरी जातीला ‘शहरी शेळी’ असेही म्हणतात. या जातील बाहेर चरायला मोकळे सोडले नाही तरी एका जागी बांधून देखील या शेळीचे पालन करता येते. नियमितपणे योग्य चारा खायला दिल्यास ही या शेळीचे वजन नऊ महिने वयापर्यंत 25 ते 30 किलो आणि एक वर्षाच्या वयात 40 किलोपर्यंत वाढते.”

error: Content is protected !!