Goat Farming : शेळीपालनासाठी ‘ही’ जात निवडा, 70 किलो असते वजन; होईल भरघोस कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात डेअरी व्यवसायानंतर शेतकरी अनेक भागांमध्ये शेळीपालन (Goat Farming) व्यवसायाला प्रकर्षाने महत्व देतात. दुग्ध व्यवसायाच्या तुलनेत शेळीपालनास कमी खर्च येतो. तसेच शेळीपालन कमी जागेतही करता येते. त्यामुळेच शेळीला ग्रामीण भागात ‘गरिबांची गाय’ असे म्हटले जाते. सध्याच्या घडीला मांसाला अधिक मागणी असल्याने, शेळीपालन व्यवसायाचे महत्व देखील वाढले आहे. मात्र, आता तुम्हीही शेळीपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल. तर नेमक्या कोणत्या जातीच्या शेळीची शेळीपालनासाठी निवड करायची? असा प्रश्न तुमच्यासमोर निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या जमुनापारी जातीबद्दल (Goat Farming) सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत…

देशात 37 हुन अधिक प्रजाती (Goat Farming Jamunapari Breed)

देशातील जवळपास 60 टक्के लोकसंख्या ही शेती आणि शेती संबंधित व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. भारतात जागतिक टक्केवारीच्या तुलनेत सर्वाधिक लोक शेळीपालन (Goat Farming) व्यवसायात गुंतले आहे. याशिवाय देशात एकूण 37 हुन अधिक शेळ्यांच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी शेळीपालनासाठी सर्वाधिक पाळली जाणारी जात म्हणजे ‘जमुनापारी शेळी’ होय. या शेळीच्या पालनातून तुम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा कमवू शकतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांमध्ये जमुनापारी शेळीची शेळीपालन व्यवसायासाठी मोठी क्रेझ आहे. ज्यामुळे शेळीपालन व्यवसाय करताना शेतकरी शेळीची ही प्रजाती निवडण्यास अधिक प्राधान्य देतात.

जमुनापारी शेळी

जमुनापारी शेळी ही भारतातील यमुना नदीच्या आसपासच्या क्षेत्रांमध्ये अधिक पाळली जाते. ज्यामुळे तिला प्रामुख्याने जमुनापारी असे नाव पडले आहे. या जातीच्या शेळ्या प्रामुख्याने भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, बिहार आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक आढळतात. या शेळीच्या पालनातून शेतकऱ्यांना अधिक मांस आणि दुधाचे उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रजातीची निवड केल्यानंतर सर्वप्रथम एक चांगल्या शेडची उभारणी करावी. शेळीपालनासाठी शेड उभारताना हवा खेळती राहील. याची काळजी घ्यावी. शेळीपालन (Goat Farming) व्यवसायासाठी कमीत कमी 8 ते 12 वर्ग फूट इतकी जागा आवश्यक असते.

काय आहे ‘या’ जातीची विशेषतः?

जमुनापारी शेळी ही आपल्या एकूण जीवन काळात 13 ते 15 पिल्लांना जन्म देते. या शेळीचे वजन हे इतर प्रजातींपेक्षा अधिक असते. या प्रजातीच्या शेळीच्या एका बोकडाचे वजन 70 ते 90 किलो इतके असते. तर मादी शेळीचे वजन हे 50 ते 60 किलो इतके असते. जमुनापारी शेळीच्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे आणि सॉल्टचे प्रमाण असते. ही शेळी दररोज 2 ते 3 लिटर दूध देते. तसेच तिच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

कशी ओळखाल जमुनापारी शेळी?

अनेकदा जमुनापारी शेळी खरेदी करताना शेतकऱ्यांसोबत धोखाधडी होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेळीची ओळख पटवताना पुढील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. या शेळीचा रंग हा पांढरा असतो. या शेळ्यांच्या पाठीवर लांब केस आणि छोटे शिंग असतात. या प्रजातीच्या शेळीचे कान मोठे आणि काहीसे दुमडलेले असतात. शेळीची ही जात काहीशी लांब आणि उंच असते. या प्रजातीच्या एका शेळीची किंमत ही जवळपास 15 ते 20 हजार इतकी असते.

error: Content is protected !!