Goat Farming : शेळीची ‘कोकण कन्याळ’ जात; शेळीपालनासाठी आहे उत्तम पर्याय!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेळीपालन व्यवसाय (Goat Farming) हा मोठ्या प्रमाणावर केला जात असून, राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक आर्थिक संधी म्हणून शेळीपालन व्यवसाय समोर आला आहे. कमी खर्चात व कमी जागेत चांगला नफा हा शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मिळणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी गरज आहे ती व्यवस्थित नियोजनाची आणि शेळीपालनासाठी योग्य जातींची निवड या गोष्टींची होय. शेळ्यांच्या विविध प्रकारच्या प्रजाती भारतात आहेत व प्रजातीनुरूप वेगवेगळे गुणधर्म प्रत्येक शेळीचे (Goat Farming) आहेत.

व्यवसायासाठी जात निवड महत्वाची (Goat Farming Konkan Kanyal Breed)

शेळीपालनासाठी आपल्याला फायदा देऊ शकेल आणि उपयुक्त अशा जातीची निवड करणे खूप महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण शेळीच्या एका महत्त्वपूर्ण जाती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता तुम्ही देखील शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात नफा मिळवण्याच्या विचारात असाल तर तुम्ही ‘कोकण कन्याळ’ या जातीच्या शेळ्यांचे पालन करू शकतात.

कोकण कन्याळविषयी माहिती

कोकण कन्याळ या जातीच्या (Goat Farming) शेळीचा विचार केला तर ही कोकण किनारपट्टीलगत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, दोडामार्ग आणि कुडाळ या भागातील असून, विदर्भात देखील या जातीच्या शेळ्या काही प्रमाणात आढळतात. प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी ही शेळी उपयुक्त असून, दर दोन वर्षात तीनदा करडांना जन्म देते.

किती वजन मिळते?

ही शेळी वयाच्या 17 व्या महिन्यात पहिल्यांदा विते. तसेच तिचे दोन वेतातील अंतराचा विचार केला तर ते आठ महिने इतके असते. या शेळीचा सरासरी दूध उत्पादन काळ 97 दिवसाचा असून, या कालावधीत 60 लिटर दूध देते. त्यासोबत या शेळीचा भाकड काळ 84 दिवसांचा असतो. कोकण कन्याळ जातीच्या नराचे वजन हे 25 किलो तर मादी शेळीचे वजन 21 किलोपर्यंत भरते. एक ते दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53 टक्के इतका असतो.

शेळीचे शारीरिक गुणधर्म

  • या जातीच्या शेळीच्या वरच्या जबड्यावर पांढऱ्या व तांबूस रंगाचे पट्टे असतात.
  • या जातीच्या शेळीचे पाय लांब असून पायावर काळा पांढरा रंग असतो. पाय लांब व मजबूत असल्यामुळे या शेळ्या डोंगराळ भागात सहज जुळवून घेतात.
  • शिंगे टोकदार असतात व कपाळ चपटे व रुंद असते. शिंगे हे सरळ व मागे वळलेली असतात. नाक रुंद असते व स्वच्छ असते.
error: Content is protected !!