Goat Farming : गाय-म्हशींद्वारे डेअरी व्यवसाय करण्यासह शेळीपालनही करावे – मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील शेतकऱ्यांनी केवळ गाय आणि म्हैस यांच्या पालनाचा दूध व्यवसाय न करता. शेळीपालन व्यवसायास (Goat Farming) देखील महत्व दिले पाहिजे. त्यातून देखील मोठी कमाई होते. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज ‘मन कि बात’ कार्यक्रमाच्या 110 व्या एपिसोडमध्ये देशाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी ओडिसा या राज्यांतील जयंती महापात्रा आणि त्यांचे पती यांनी उभारलेल्या ‘बकरी बँक’ उल्लेख देखील केला आहे. या बँकेच्या माध्यमातून हे जोडपे परिसरातील शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी (Goat Farming) शेळ्या उपलब्ध करून देत आहेत. ज्यामुळे त्यांच्या जवळपास 40 गावांचा विकास झाल्याचे मोदी यांनी कार्यक्रमात म्हटले आहे.

शेळीपालनावर लक्ष केंद्रित करावे (Goat Farming
Modi’s Advice To Farmers)

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, ओडिसा या राज्यातील जयंती महापात्रा आणि त्यांचे पती यांनी कलाहांडी गावात बकरी बँक उभारली आहे. ज्यामुळे त्यांच्यासह आसपासच्या गावातील जीवनमान उंचवण्यासाठी देखील मदत झाली आहे. सामूहिक स्तरावर शेळीपालन करण्याचा हा खूप मोठा प्रकल्प निर्णय असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुपालन करताना केवळ गाय किंवा म्हैस यांचा विचार न करता. शेळीपालन (Goat Farming) हा देखील एक मोठा व्यवसाय आहे. त्याकडे देखील लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेळीपालनास शेतकऱ्यांनी आपल्या उपजीविकेचे साधन बनवले आहे. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

‘ड्रोन दीदी योज़नेची चर्चा’

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अनेक मुद्द्यावर चर्चा केली. तसेच त्यांनी म्हटले आहे की, शेतीमध्ये महिलांची वाढणारी संख्या ही उल्लेखनीय आहे. आपण विचारही करु शकत नव्हतो. मात्र, आता देशातील सर्व आशा वर्कर्स गावागावांमध्ये शेतकऱ्यांना ड्रोन वापरण्याचे प्रशिक्षण देणार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. आज देशातील गावागावांमध्ये ड्रोन दीदी योज़नेची चर्चा आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून शेतकरी लवकरच आपल्या खतांची आणि औषधाची फवारणी ड्रोनद्वारे करू शकणार आहे. असेही त्यांनी 110 व्या मन कि बात कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.

error: Content is protected !!