Goat Farming : ‘ही’ आहे सर्वात जास्त दूध देणारी सानेन जातीची शेळी; शेळीपालनातून व्हाल मालामाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून बरेच शेतकरी पशुपालन व्यवसाय करतात. पशुपालन व्यवसायामध्ये शेळीपालन (Goat Farming) हा एक कमी खर्चिक व्यवसाय आहे. शेतकरी वर्गाला शेळीपालन व्यवसाय परवडतो. तसेच व्यावसायिक शेळीपालनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. परंतु शेळीपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी शेळ्यांच्या उत्तम जातींची निवड करता येणे खूप आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण ‘शेतकऱ्यांचे एटीएम’ समजल्या जाणाऱ्या सानेन शेळीबद्दल (Goat Farming) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

कोणते आहे मुळस्थान? (Goat Farming Sanen Goat Breed)

सानेन जातींच्या शेळ्यांचे मुळस्थान स्वित्झर्लंड आहे. आता युरोप, अमेरिकेपासून अफगाणिस्तानात ही शेतकरी या शेळ्या मोठ्या प्रमाणात पाळत आहेत. सानेन जातीच्या शेळीचा गाबन काळ फक्त पाच महिन्यांचा असतो. त्यामुळे पाच ते सहा वेते सहज मिळू शकतात. या जातीच्या शेळीपासून (Goat Farming) एका वेतात कधी दोन तर कधी तीन करडे मिळतात. तीन वेतात पाच करडे मिळू शकतात. इतर गावठी शेळ्यांच्या तुलनेत गाभण राहण्याचे या जातीचे प्रमाण अधिक आहे.

वातावरणाशी घेते जुळवून

सानेन शेळी त्यांच्या आकर्षक पांढर्‍या रंगासाठी आणि विविध हवामानाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते. ज्यामुळे सानेन शेळी (Goat Farming) जगभरातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक लोकप्रिय पर्याय होत आहे. सानेन जातीची शेळीमध्ये दिवसाला पाच ते बारा लिटर दूध देण्याची क्षमता आहे. ज्यात फॅटचे प्रमाण सुमारे ३-४ टक्के असते. ज्यामुळे ही शेळी उच्च-गुणवत्तेत दुधाची विश्वसनीय शेळी झाली आहे.

सानेन जातींच्या शेळ्यांची वैशिष्ट्ये

  • या जातीच्या शेळ्या कोणत्याही प्रकारच्या हवामानात सहज तग धरू शकतात.
  • ज्वारीचा कडबा, मका, अशा पारंपरिक चार्‍यावर देखील या शेळ्यांचे पालन करता येते.
  • सर्व प्रकारच्या खाद्याचे, गवताचे आणि अपारंपरिक खाद्याचे दूध, मांस आणि कातडी मध्ये रूपांतर उत्तम पद्धतीने करतात.
  • या शेळ्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असून विविध आजरांस लवकर बळीपडत नाही.
  • शेळ्या दुरवर रानात, डोंगर कपाऱ्यात करण्यास जाऊ शकतात. तसेच कमीत कमी भांडवली गुंतवणूक व्यवस्थापन करणे सहज शक्य असते.
  • कोणत्याही वातावरणाशी समरस होण्याची नैसर्गिक क्षमता असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या निवाऱ्याची गरज नसते.
error: Content is protected !!